Talathi Bharti 2023 : महसूल विभागातील (गट क) तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याच्या दिवसाला दहा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी ‘छात्रभारती’ तर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान शासनातर्फे एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तलाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख असताना दिवसभर संकेतस्थळ बंदच होते, त्यामुळे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, १० दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली.
सायंकाळी शासनाने एक दिवसांच्या मुदतवाढीचा आदेश काढला. (1 day extension for revenue talathi recruitment nashik news)
शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून २६ जूनपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरवात झाली होती. आज (ता.१७) जुलैला तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असताना आज दिवसभर संकेतस्थळ बंद होते.
दरम्यान तलाठी भरती परीक्षा शुल्कात भरमसाट वाढ झाल्याने तरुण- तरुणी, विद्यार्थ्यांसह छात्रभारती विद्यार्थी संघटनेने परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र, परिक्षा शुल्कात कुठलीही कपात न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाही, तसेच दोन दिवसांपासून अर्ज करण्याच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत.
१७ जुलै शेवटची तारीख असताना दिवसभर वेबसाइट बंद असल्याने तरुण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने महसूल विभागाच्या (गट क) तलाठी भरती अर्ज करण्याची तारीख १० दिवसांसाठी वाढवावी, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.
परिक्षा शुल्कासाठी २० पर्यत मुदतवाढ
आज महसूल विभागाने अर्ज भरण्यास एक दिवसांची मुदतवाढ देण्याचा आदेश काढला. जमाबंदी विभागाचे अप्पर आयुक्त आनंद रावते यांनी काढलेल्या आदेशानुसार आता उद्या (ता.१८) पर्यत अर्ज करता येणार आहे. परिक्षा शुल्क भरण्यासाठी २० जुलैपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.