Land Fraud latest crime news esakal
नाशिक

जमीन विकसित न करता 110 कोटींचा अपहार; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील मानस रिसॉर्ट परिसरातील सुमारे ३० एकर जागा विकसित करण्यासाठी मुंबईतील सिल्व्हरस्टार लॅण्ड डेव्हलपर्स ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीला दिली असता सदरील कंपनीच्या संचालकांनी जागा विकसित केली नाही.

तसेच सदरची जमिनीचे बनावट दस्ताऐवजावरून गहाण खते करून मुंबईतील बँकेकडे गहाण ठेवून ११० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इगतपुरी पोलिसात आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (110 crore embezzlement without developing the land case has been filed against 8 people nashik crime Latest Marathi News)

मानस रिसोर्टचे मालक नितीन मनोहर करंबळेकर ( ६२, रा. मानस रिसॉर्ट, तळेगाव शिवार, ता. इगतपुरी जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, कौशल मुकेश दोशी, मुकेश मगनलाल दोशी, अंकित महेश दोशी, स्वप्निल अनिल कुलकर्णी, दीपक देवजी गायकर, नीलेश हर्षदराय मोदी, दर्शन नितीनकुमार धामी, जतिन योगेश मेहता या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंबळेकर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या मानस रिसॉर्टजवळ ३० एकेर १९ गुंठे जागा असून सदरील जागा विकसित करण्यासाठी २०१५ मध्ये त्यांनी मुंबई, सांताक्रुझ येथील सिल्व्हरस्टार लॅण्ड डेव्हलपर्स ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीचे संचालक कौशल दोशी यांना अटी-शर्ती ठरवून सामंजस्य करार करून विकसित करण्यासाठी दिली.

दरम्यान, जुलै २०२२ मध्ये करंबळेकर यांनी जमीन विकसित न करण्याबाबत विचारणा केली असता संशयित दोशी यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शंका बळावल्याने करंबळेकर यांनी या संदर्भात चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

संशयितांनी या दरम्यान, मुंबईतील न्यू इंडिया को.ऑप. बँकेकडे त्यांच्या असलेल्या गहाण मालमत्ता मुक्त करून करंबळेकर यांची जमीन त्यांच्या संमतीशिवाय गहाण ठेवली. तसेच, संशयितांनी सामंजस्य करारातील अटी-शर्तींचा भंग करून करंबळेकर यांची ११० कोटी रुपयांत फसवणूक केली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT