Market committee Latest News esakal
नाशिक

पावसामुळे बाजार समितीत 15 % पालेभाज्या आवक; संततधारेने शेतकऱ्यांना झटका

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाच्या (Rain) संततधारेने शेतकऱ्यांनादेखील झटका दिला आहे. नेहमी होणाऱ्या पालेभाज्या (Leafy Vegetables) आवकेपेक्षा पावसामुळे फक्त पंधरा टक्के पालेभाज्या आवक झाल्या. (15 percent inflow of leafy vegetables in market committee due to heavy rains Nashik Latest Monsoon news)

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक शहर लगत असलेले म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद तसेच सुरगाणा, पेठ, करांजाळी, निफाड, सिन्नर तालुक्यातून भाजीपाला आवक होत असते. मुंबईसह, अहमदाबादमध्ये नाशिकच्या पालेभाज्यांना मोठी मागणी असते. पावसाची गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू आहे.

यामुळे नेहमी होणाऱ्या आवकेपेक्षा भाजीपाला आवक कमी झाली आहे. गावठी व चायना कोंथिबीर १७ हजार ६०० जुडी आवक झाली असून, गावठी कोंथिबीर किमान दोन हजार पाचशे रुपये, सरासरी पाच हजार तर सहा हजार रुपये प्रती शेकडा सर्वाधिक भाव, तर चायना कोंथिबीर किमान तीन हजार सरासरी, पाच हजार तीनशे पन्नास सर्वाधिक, सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रती शेकडा भाव मिळाला.

मेथी दोन हजार जुडी आवक झाली असून, किमान एक हजार सरासरी तीन हजार पन्नास तर सर्वाधिक तीन हजार पाचशे रुपये प्रती शेकडा भाव मिळाला. शेपू चार हजार चारशे जुडी आवक झाली असून, किमान आठशे सरासरी, सोळाशे सर्वाधिक, दोन हजार नऊशे रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. कांदापात चार हजार पाचशे तीस जुडी आवक झाली.

किमान पंधराशे सरासरी, तीन हजार चारशे सर्वाधिक, चार हजार पाचशे रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. या एकूण पालेभाज्या पैकी चाळीस टक्के गुजरात, चाळीस टक्के मुंबई, तर उर्वरित वीस टक्के हा स्थानिकसाठी असतो.

गुजरातला माल रिस्क फॅक्टरवर

नाशिक जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालेभाज्या आवक कमी झाली आहे. आलेल्या पालेभाज्यापैकी चाळीस टक्के माल हा गुजरातला व्यापारी पाठवीत असतो. परतू, गुजरातलाही पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. बलसाड, नवसारी बऱ्याच ठिकाणचे मार्गदेखील बंद झालेली आहेत. पाठविण्यात येणार माल हा रिस्क फॅक्टरवर पाठविला जात असतो, असे काही व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT