fund sakal
नाशिक

Nashik ZP School : येवला मतदारसंघातील जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP School : येवला मतदारसंघातील ६५ जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मतदारसंघातील शाळांची दुरुस्ती होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा मिळणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत शाळेच्या इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी मतदारसंघातील ६५ शाळांना दोन कोटी ३० लख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. (2 crore fund for repair of ZP schools in Yeola Constituency nashik news)

यामध्ये येवल्यातील जिल्हा परिषद शाळा आहेरवाडीसाठी पाच लाख ४० हजार, रामवाडी अंदरसूल शाळेसाठी तीन लाख ८० हजार, शंकरवाडी शाळेसाठी दोन लाख २५ हजार, अंगुलगाव शाळेसाठी पाच लाख ४० हजार, दहेगाव शाळेसाठी दोन लाख, बोंबलेवस्ती शाळेसाठी तीन लाख ५० हजार, कानडी शाळेसाठी तीन लाख २५ हजार, महालखेडा शाळेसाठी तीन लाख ५० हजार, लमाणतांडा, मातुलठाण शाळेसाठी प्रत्येकी दोन लाख, अंबूमाळीमळा शाळेसाठी दोन लाख ६२ हजार.

तांबडधोंडा शाळेसाठी एक लाख ७५ हजार, पाटील वस्ती शाळेसाठी पाच लाख दहा हजार, पन्हाळसाठे शाळेसाठी दोन लाख ८९ हजार, पांजरवाडी शाळेसाठी सहा लाख १५ हजार, रहाडी शाळेसाठी चार लाख ८५ हजार, नाईकवस्ती शाळेसाठी तीन लाख दहा हजार, हनुमाननगर सोमठाण जोश शाळेसाठी दोन लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिवाजीनगर तळवाडे शाळेसाठी तीन लाख २० हजार.

ठाणगाव शाळेसाठी चार लाख ५० हजार, तांदूळवाडी शाळेसाठी पाच लाख, वडगाव, पिंप्री, घानामाळी मळा, माळवाडी, हनुमानवाडी मुखेड, मानोरी बु. आदिवासी वस्ती सत्तेगाव, वाघवस्ती राजापूर शाळेसाठी प्रत्येकी दोन लाख, सोमाशेवस्ती, नगरसूल, आडगाव रेपाळ, वळदगाव शाळेसाठी तीन लाख, बऱ्हेमळा, सोनवणे वस्ती, महादेववाडी धामणगाव, कातोरेवस्ती, शेवगे, पुरणगाव, आडवाट, एरंडगाव बु., देवदरी, हवालदार वस्ती शाळेसाठी प्रत्येकी दोन लाख ५० हजार, येवला स्टेशन, माळवाडी देशमाने, दत्तवाडी मुखेड, सत्यगाव, जळगाव, ममदापूर, अनकाई बारी शाळेसाठी प्रत्येकी चार लक्ष.

नागडे शाळेसाठी सहा लाख, खिर्डीसाठे शाळेसाठी आठ लाख, एरंडगाव खु. शाळेसाठी तीन लाख ७० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर शाळेसाठी चार लाख ६९ हजार, विंचूर शाळेसाठी चार लाक ५० हजार, वेळापूर, बोकडदरा, विष्णूनगर, विठ्ठलवाडी शाळेसाठी प्रत्येकी सहा लाख, हनुमाननगर, विंचूर माळी शाळेसाठी प्रत्येकी तीन लाख, उर्दू शाळा विंचूरसाठी चार लाख ५० हजार, धरणगाव वीर शाळेसाठी चार लाख ३५ हजार, तर मऱ्हळगोई शाळेसाठी पात लाख ८० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT