corona updates in nashik division 
नाशिक

नाशिक विभागात २ लाख रुग्ण कोरोनामुक्त! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२२ टक्के

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत २ लाख १६ हजार ५६ रुग्णांपैकी २ लाख १ हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ९३.२२ एवढे आहे. आजपर्यंत विभागात ४ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर १.९४ टक्के इतका आहे. सद्यस्थितीत विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये एकूण १० हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ७ लाख १० हजार ८७८ अहवाल पाठविण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख १६ हजार ५६ अहवाल पॉझिटीव्ह आले असून रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ३०.३९ टक्के इतके आहे. तसेच विभागात १३ हजार ६९१ व्यक्ति होमक्वारंटाईन तर ९७० व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ५७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८२ हजार ५०८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१० टक्के इतके आहे. आजपर्यंत १ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

जळगाव

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ५२ हजार २९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९ हजार ३५४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ६९० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३८ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार २४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

धुळे

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार १७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२ हजार ४७२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके आहे. आजपर्यंत ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ५३ हजार ९३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५१ हजार ५२५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ५८५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्के इतका आहे. आजपर्यंत ८२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण अल्प 

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ६ हजार ८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ हजार ५५५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३२ टक्के इतके आहे. आजपर्यंत १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT