Pelican Signal esakal
नाशिक

Nashik News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी शहरात 20 पेलीकन सिग्नल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांना सिग्नल ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील २० ठिकाणी पेलीकन सिग्नल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रोडवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. (20 pelican signals in city for senior citizens disabled people Nashik News)

शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याप्रमाणे सिग्नलदेखील वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची संख्या निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीचा सामना सर्वच नागरिकांना होत आहे. त्यातही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागते.

त्यासाठी नाशिक स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे पेलीकन सिग्नल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिग्नलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहजपणे सिग्नल वरून ये- जा करता येणे शक्य आहे. परदेशात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सिग्नल पार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते.

तेच तंत्रज्ञान पेलीकन सिग्नलमध्ये वापरले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या सिग्नलवर ही यंत्रणा उभारली जाणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवर सिग्नलची प्राथमिक चाचणी घेतली जाईल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

वाहतूक थांबविण्याचे नियोजन

पेलीकन सिग्नल म्हणून जे सिग्नल निश्चित करण्यात आले आहे, तेथे सिग्नल वर एक बटन राहील. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना रस्ता ओलांडायचा असेल तर या बटनाचा आधार घेता येईल. बटन दाबल्यानंतर चारही बाजूला लाल दिवे लागतील.

१५ सेकंद लाल दिव्यांसाठी असेल, त्याचदरम्यान दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडता येईल. १५ सेकंदानंतर यंत्रणा पूर्ववत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT