ZP Nashik news
ZP Nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 2362 ZP कर्मचाऱ्यांनी दिली Pre-Test

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई आयआयटी यांच्याकडील कुपोषण व स्तनपानविषयक उपक्रमाकरिता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत निवडलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या झालेल्या पूर्वपरीक्षेला (प्री-टेस्ट) चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पात्र ठरलेल्या दोन हजार ४०२ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल दोन हजार ३६२ अधिकारी-कर्मचारी यांनी ही परीक्षा दिली आहे. पहिल्या टप्प्यातील प्री-टेस्ट झाल्यानंतर या परीक्षार्थींची येत्या ७, ८ फेब्रुवारीला पुन्हा परीक्षा होईल. यातून २५० अधिकारी-कर्मचारी यांची निवड केली जाणार आहे. (2362 ZP employees of district give Pre Test Nashik News)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून बालकांचे कुपोषण व स्तनपानविषयक महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांमधून २५० प्रशिक्षकांची निवड करण्यात येऊन त्यांचे ३ महिन्यांकरिता गावपातळीवरील प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

या २५० प्रशिक्षकांमधून ५० मुख्य प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. यात आशासेविका, सेवक, पर्यवेक्षिका, एनआरएचएम, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या उपक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सेफ ॲपद्वारे निवड झालेल्या दोन हजार ५०० परीक्षार्थींची गत आठवड्यात परीक्षा झाली. उमेदवारांना व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासक्रम देण्यात आला होता. ४० उमेदवार गैरहजर राहिले.

तालुकानिहाय परीक्षार्थी

बागलाण (२१७), चांदवड (१०८), देवळा (११४), दिंडोरी (२१०), इगतपुरी (१५१), कळवण (१३०), मालेगाव (१५८), नांदगाव (११३), नाशिक (१३०), निफाड (२२०), पेठ (१८६), सिन्नर (११८), सुरगाणा (१६९), त्र्यंबकेश्वर (१२६), येवला (२१२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supplementary CET : पुरवणी सीईटीबाबत संभ्रम;बीबीए, बीसीएबाबत महाविद्यालयांकडून तारखेचा संदेश प्रसारित

Accident News : मुंब्रा बायपासवरून खाली मिक्सर पलटी होऊन एकाचा मृत्यू,तर सहाजण गंभीर जखमी

Crime News : दारू पिऊन घरात त्रास देत असल्याने आई व बहीणीने सुपारी देऊन केला तरूणाचा खून

Meeting of MLAs : प्रश्न धसास लावण्यासाठी वज्रमूठ;‘सकाळ’तर्फे बैठक,एकत्रित आवाज उठविण्याचा जिल्ह्यातील आमदारांचा निर्धार

Ambadas Danve : टक्केवारीमध्ये अडकले विद्यार्थ्यांचे गणवेश;दानवे, गुजरातच्या कंत्राटदारांना पोसण्याचे धोरण

SCROLL FOR NEXT