28 TMC of water will be diverted to deficit basins of Godavari Girna river nashik news esakal
नाशिक

Nashik Chhagan Bhujbal : गोदा- गिरणा खोऱ्यात येणार 28 टीएमसी पाणी; मंत्री छगन भुजबळांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Chhagan Bhujbal : जिल्ह्यातील एकदरा गोदावरी व नार-पार- गिरणा या दोन नदीजोड प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाले असून, एकदरा-गोदावरी (वाघाड) या वळण योजनेच्या प्रकल्प अहवालाची अंतिम तपासणी सुरू आहे.

दमणगंगा- वैतरणा- गोदावरी (देव नदी, सिन्नर) या प्रकल्पाचा अहवाल जुलैअखेरीस जलसंपदा विभागाला प्राप्त होणार आहे.

या चार प्रकल्पांमधून साधारणपणे २८ टीएमसी पाणी गोदावरी, गिरणा या तुटीच्या खोऱ्यांमध्ये वळविले जाईल. यासाठी उपसा योजनांच्या माध्यमातून ३०० ते ५०० मीटरपर्यंत पाणी पाइपलाईनद्वारे उचलले जाणार आहे. (28 TMC of water will be diverted to deficit basins of Godavari Girna river nashik news)

जिल्ह्यातील चार वळण योजनांच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनांविषयीचे संकेत दिले असून, त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नार-पार दमणगंगा आदी पश्चिम वाहिनी नद्यांचे १३५ टीएमसी पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात वाहून जाते.

हे वाहून जाणारे पाणी अडवून ते उपसा वळण योजनेद्वारे नाशिक व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी घेतला होता. त्यानुसार पार- गोदावरी (कादवा), एकदरा- गोदावरी (वाघाड) व दमणगंगा- गारगाई- गोदावरी (देव नदी, सिन्नर) आणि नार-पार-गिरणा या चार प्रस्तावित वळण योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया जवळपास पाच वर्षांपासून सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात प्रस्तावित केलेल्या २४ प्रवाही वळण योजनांपैकी १४ योजना पूर्ण झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी वळविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात कळमुस्ते व चिमणपाडा या दोन योजनांना मंजुरी दिली असून, उर्वरित योजनांनाही लवकरच मान्यता मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव या दुष्काळी तालुक्यांप्रमाणेच मराठवाड्यालाही अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकेल.

अशा आहेत चार उपसा वळण योजना

पार- गोदावरी (कादवा) : ३.५ टीएमसी

नारपार गिरणा : १२.५ टीएमसी

एकदरा- गोदावरी (वाघाड) : ५ टीएमसी

गारगाई- गोदावरी (देव नदी सिन्नर) : ७.५ टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT