Air Pollution
Air Pollution esakal
नाशिक

N Cap Scheme : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात 3 केंद्रे; एन- कॅप योजनेंतर्गत 70 कोटीचा निधी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी शहरात तीन हवा (Air) गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे. (3 centers in city to improve air quality 70 crore funds received under N Cap scheme nashik news)

केंद्र सरकारच्या हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रम अर्थात एन- कॅप योजनेंतर्गत सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्या निधीतून यंत्रणा उभारण्यात आली आहे. वडाळा- पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ असे तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत.

देशभरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यात आला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे सर्वेक्षण नोंदविण्यात आल्याने त्यानुसार जवळपास ७० कोटी रुपयांचा निधी हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी देण्यात आला आहे.

या निधीतून हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे. वडाळा- पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ असे तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या निरीक्षणाखाली केंद्रे कार्यरत करण्यात आले आहे. केंद्र उभारणीसाठी महापालिकेने इन्फ्रास्ट्रक्चर पुरविले आहे. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत यांत्रिकी झाडू खरेदी केले जाणार आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पार पडली आहे.

तीन विद्युत शवदाहिनी

एन-कॅप योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. हवा गुणवत्ता सुधारण्याचा भाग म्हणून लाकडावरील शवदहनाला पर्याय म्हणून विद्युतदाहिनी हा पर्याय आहे. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दसक, पंचवटी व मोरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये विद्युत शवदाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतदाहिनीसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प

महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्पासाठी तरतूद केली आहे. ‘एन-कॅप’ अंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधकाम विल्हेवाट प्रकल्प उभारला जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक शहराचा क्रमांक घसरण्यामागे बांधकाम डेब्रिजचा कचरा हे प्रमुख कारण होते. त्यामुळे बांधकाम साइटवर ग्रीन नेट लावण्याबरोबरच बांधकाम डेब्रिजची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. पाथर्डी येथील खत प्रकल्पाच्या बाजूला नवीन प्रकल्प असेल.

दुभाजकांमध्ये शोष वनस्पती

हवेतील नायट्रोजन, सल्फरडाय ऑक्साईड, असे सस्पेंडेड पार्टिकल मॅटर असे विषारी घटक शोषून घेणारी वनस्पती रस्ता दुभाजकांमध्ये लावली जाणार आहे. त्याचबरोबर एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रुफ टॉप बसविणे आदी कामे केली जाणार आहे.

"शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याबरोबरचं निरीक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT