funds esakal
नाशिक

Nashik News: मंदिर परिसर विकासासाठी 3 कोटी; नाशिक तालुक्यातील 14 मंदिर परिसराचा होणार विकास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मंदिर परिसराचा विकासासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत २०२३-२४ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला गुरुवारी (ता. १६) मान्यता दिली.

नाशिक तालुक्यातील तीन, इगतपुरी तालुक्यातील दहा; तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पर्यटनस्थळाचा समावेश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. (3 crore fund approved for temple campus development nashik news)

नाशिक लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील गावांमधील मंदिर परिसर विकासासाठी निधीची मागणी केली होती.खासदार गोडसे यांच्या मागणीची दखल घेत, राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने तीन कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली.

या निधीतून नाशिक तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथील मारुती मंदिरामागे सभामंडप बांधणे, देवरगाव येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, दहेगाव येथील भवानी मंदिरासमोर मंडप बांधणे, तसेच खरोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील गावदेवी मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे या कामांसाठी प्रत्येकी २० लाखांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, गोंदे येथील भवानी माता मंदिर सभामंडप बांधणे, मुकणे येथील मारुती मंदिरासमोर सामाजिक सभागृहाची उभारणी करणे, वाडीवऱ्हे येथील दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे, पिंपरी सदोजवळील तोरणपाडा येथे मारुती मंदिर सभामंडप बांधणे, पिंपळगाव डुकरा येथील गोंडेवाडी परिसरात मारुती मंदिर सभामंडप बांधणे, वांजोळे येथील मारुती मंदिर सभामंडप बांधणे, भावली येथील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणेकामी प्रत्येकी २० लाख, तर कुशेगाव येथील देवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे आदी कामांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT