girl harrasment  esakal
नाशिक

नाशिक शहरात विनयभंगाच्या 3 घटना; नागरिकांमध्ये दहशत

नाशिक शहरात वेगवेगळ्या भागातील दोन अल्पवयीन व एका महिलेचा विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागातील दोन अल्पवयीन एका महिलेचा रविवारी (ता. १५) विनयभंग झाला. याप्रकरणी पंचवटी, इंदिरानगर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. यापैकी इंदिरानगरच्या गुह्यातील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

अशा आहेत तिघ घटना

पंचवटीतील महिला रविवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये बसलेली असताना समोर राहणाऱ्या बाप- लेकाने शिवीगाळ करीत मागील भांडणाची कुरापत काढून महिलेस शिवीगाळ व मारहाण केली. मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. महिला जखमी झाली असून संशयितांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्याशी ओळख वाढविली. सेल्फी काढून नातेवाइकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केली. तसेच वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग आणि लैंगिक फसवणूक केल्याचे म्हटले आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक केली आहे.

देवळाली कॅम्प भागात मुलगी रस्त्याने पायी जात असताना संशयिताने अडवत विनयभंग केला. घराजवळ गाठत त्याने झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला तोंड दाखविण्यास जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली. मुलीने कुटुंबीयांकडे आपबिती सांगितल्यावर हा प्रकार पोलिसात पोचला. अधिक तपास महिला उपनिरीक्षक टी. एस. पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांचा उंबरखिंडीत लढतानाचा AI व्हिडिओ व्हायरल! फक्त ४ तासांत इतिहास उलटला, २५ हजार मुघल गारद

"मेरे लाईफ में हिरो की एंट्री हो गयी है"; तुला पाहते रे फेम गायत्री दातारच्या आयुष्यात खऱ्या विक्रम सरंजामेची एंट्री !

Maharashtra Politics : पुढील दोन महिन्यांत मोठा राजकीय बदल; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील - ॲड. प्रकाश आंबेडकर!

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Latest Marathi News Live Update: शुभम जयस्वालच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) छापेमारी पूर्ण झाली

SCROLL FOR NEXT