death  esakal
नाशिक

Nashik News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटीमध्ये वयोवृद्धाने तर, अंबड परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास लावून घेत आत्महत्त्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आत्महत्त्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (3 suicides in different incidents in city nashik news)

पंचवटीतील फडोळ मळ्यात ६४ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्त्या केली. तानाजी भिकाजी फडोळ (रा.फडोळ मळा, मखमलाबाद रोड) असे मयत वृद्धाचे नाव असून, त्यांनी शनिवारी (ता. १५) दुपारी साडेचारच्या सुमारास बाथरुममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना सिडको घडली. भाऊसाहेब राजाभाऊ राजवाडे (५२, रा. वीर सावरकर चौक, सिडको ) यांनी शनिवारी (ता.१५) राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

तिसरी घटनाही अंबड हद्दीतील दत्तनगरमध्ये घडली. सोनू काशिनाथ शिंपी ( ४०, रा. ठाकरे गार्डनजवळ, दत्तनगर, कारगिल चौक, अंबड) यांनी गेल्या शनिवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घराच्या पत्र्याच्या अंगलला गळफास लावून घेतला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT