NMC School esakal
नाशिक

NMC School News : बांधकाम विभागाचा शाळा दुरुस्तीकडे काणाडोळा; महापालिकेच्या 30 शाळा नादुरुस्त

सकाळ वृत्तसेवा

NMC School News : रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

महापालिकेच्या ७९ पैकी तब्बल ३० शाळा नादुरुस्त व गळक्या असून त्यावर खर्च करण्याची तजवीज न केल्याने गळक्या शाळांमध्ये छत्री घेऊन बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (30 municipal schools are in bad condition nashik news)

शहरामध्ये नाशिक महापालिकेच्या ७९ शाळा आहे. शाळांसाठी महापालिकेने ७८ इमारती उपलब्ध करून दिले आहे. ६९ शाळांना स्मार्ट दर्जा देण्यात आल्या आहे. ७८ शाळांपैकी तब्बल ३० शाळा गळक्या असल्याची बाब महापालिका शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली आहे शाळांची गळती व दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

परंतु शाळा दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. वास्तविक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागानेच शिक्षण विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भात आयुक्तांना माहिती अवगत करून देण्याची आवश्यकता आहे.

परंतु तसे न करता रस्त्यांवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या बांधकाम विभागाने शाळा दुरुस्तीकडे मात्र काणाडोळा केला परिणामी शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतर पावसामुळे शाळा गळक्या असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निधी देता का?

शाळा दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाच्या मार्फत होते. परंतु दुरुस्तीचे काम किचकट असल्याने बांधकाम विभागाकडून सर्रास दुर्लक्ष होते. शाळा दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडे पाच कोटी रुपयांची तरतूद आहे. उर्वरित निधीसाठी महापालिका शिक्षण मंडळांनी इतर विभागाकडे अतिरिक्त असलेला निधी वर्ग करावा अशी मागणी केली आहे.

"तीच शाळांच्या दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे मात्र अंदाजपत्रकात फक्त पाच कोटी रुपयांची तरतूद असल्याने अन्य विभागाकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे." - बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT