Nashik District Bank esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामात जिल्ह्यात 351 कोटींचे कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदा वर्षीच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत ३५१.५५ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ५९.९५ टक्के इतके पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ३४५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज घेता येणार आहे. (351 crore loan disbursement in district during Kharif season by district bank Nashik News)

आगामी खरीप हंगामासाठी एक एप्रिल २०२३ पासूनच पीक कर्ज वाटप सुरु केल्याचे जिल्हा बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६१५ कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे.

यात खरीप हंगामासाठी ५९८.६८ कोटींचे उद्दिष्ट्य आहे. रब्बी हंगामासाठी १६३.२ कोटींचे उद्दिष्ट्य आहे. खरीप हंगामासाठी एक एप्रिल २०२३ पासून कर्ज वाटप सुरू झालेले असून आतापर्यंत २९ हजार १४२ हेक्टर क्षेत्रावरील ३६ हजार ३४५ शेतकऱ्यांना ७ जून २०२३ अखेर ३५१.५५ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. खरिपासाठी सरासरी ५९ टक्के कर्ज वाटप झाले आहे.

तालुकानिहाय विचार करता निफाड तालुक्यात सर्वाधिक ९ हजार ६७२ शेतकऱ्यांना १२७.३० कोटींचे पीक कर्जवाटप झाले आहे. यापाठोपाठ मालेगाव तालुक्यात ४ हजार ६२१ शेतक-यांना ३०.१५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

याशिवाय चांदवड २४.२० लाख, देवळा १२.१० लाख, इगतपुरी १.७२ लाख, कळवण ४.९६ लाख, दिंडोरी२६.७० लाख, नांदगाव १३.७७ लाख, नाशिक ३४.८९ लाख, पेठ ३३ लाख, सटाणा १७.७७ लाख, सिन्नर १३.९० लाख, सुरगाणा ५६ लाख, त्र्यंबकेश्वर ५.५८ लाख, येवला ४२.६० लाख रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही.

त्यामुळे पेरण्यांना अद्याप सुरवात झालेली नाही. पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरण्यांना सुरवात झाल्यानंतर, पीक कर्ज मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात

खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट : ५९८.६८ कोटी रुपये

आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप : ३५१ कोटी ५५ लाख ३० हजार रुपये

पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी : ३६ हजार ३४५

पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र : २९ हजार १४२ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT