Death News
Death News esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये विविध घटनांत 4 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

ध्रुवनगरला लिफ्टच्या खड्यात बुडून बालकाचा मृत्यू

नाशिक : लिफ्टच्या खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर शिवारातील ध्रुवनगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनी हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुभाष भागवत, (वय १०, वाळूंज गॅलेक्सी, मोतीवाला कॉलेजजवळ, शिवशक्ती कॉलनी, ध्रुवनगर, गंगापुर शिवार) असे दुदैवी बालकाचे नाव आहे.

ध्रुव टॉवर बिल्डिंगमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पाणी साचले आहे. या खड्डयात पडून यश पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच त्यास पाण्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतू तोपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

(4 people died in different incidents in Nashik News)

वाहनच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यु

नाशिक : सातपरला पोलिस ठाण्यासमोरील सकाळ सर्कल परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला.

मध्यरात्री दुचाकीस्वाराला वाहनाने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉ. पगारे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

झोपेत बेडवरुन पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यु

नाशिक : सातपूरला श्रमिक नगर भागात रात्री झोपेत बेडवरुन पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु झाला. नामदेव गजानन खांडेकर (वय ७०, साई व्हिला, पाण्याच्या टाकीसमोर गंगासागर नगर श्रमिकनगर ) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

काल गुरुवारी (ता.२६) दुपारी एकच्या सुमारास ते घरात बेडरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा मुकुंद खांडेकर याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, दुपारी सव्वा चारच्या सुमारास डॉ. पटेल यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

जल शुध्दीकरण केंद्रावर ज्येष्ठाचा मृत्यु

नाशिक : निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्याच्या छातीत दुखु लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा मृत्यु झाला. दत्तात्रय बाबूराव झुरडे (वय ७०, कोळीवाडा गणेशवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी (ता.२५) दुपारी एकच्या सुमारास निलगिरी बाग जल शुध्दीकरण केंद्रावर त्याच्या छातीत दुखु लागल्याने तसेच मान आणि घशाला सुज आल्याने त्याला उपचारासाठी मालक दीपक महादेव जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आडगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT