Fire department personnel controlling the fire esakal
नाशिक

Fire Accident : वर्षभरात शहरात 404 आगीच्या घटना; खोडसाळपणा म्हणून केलेल्या 9 खोट्या घटना

- युनूस शेख

जुने नाशिक : गेल्या वर्षात शहरात ४०४ आगीच्या घटना घडण्याची नोंद अग्निशामक विभागात करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक घटना ७४ एप्रिल महिन्यात, तर सर्वात कमी १२ घटना जुलै महिन्यात घडल्या आहे. एकूण घटनांमध्ये केवळ खोडसाळपणा म्हणून केलेले ९ खोट्या घटनांचा समावेश आहे. (404 fire incidents in city during year nashik news)

वर्षभरात सुमारे ४०४ अर्थात वर्षाच्या ३६० दिवसांपेक्षाही अधिक घटना घडल्या आहे. सरासरी दिवसाला एक ते दोन घटना घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ४०४ घटनांमध्ये केवळ नऊ घटना खोडसाळपणा करत खोटे कॉल असल्याचे आढळून आले आहे.

आपत्कालीन कॉल असल्याने अग्निशामक विभागाचे कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ते कॉल खोटे असल्याने त्यांना माघारी परतण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे यंदा वाहनांना आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यांचाही यात समावेश आहे.

या केवळ अग्निशामक विभागात नोंद असलेल्या घटना आहेत. याव्यतिरिक्त काही घटना अशा घडल्या आहेत, की त्यांची माहिती नागरिक तसेच पीडितांकडून अग्निशामक किंवा पोलिस विभागास देण्यात आलेली नाही. त्या घटनेचा विचार केला तर आगीच्या घटनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खोट्या कॉलचा त्रास

अग्निशामक विभागास अनेक वेळा आग लागण्यासह विविध आपत्कालीन घटना घडण्याचे खोटे कॉल येत असतात. आपत्कालीन परिस्थिती म्हणून अग्निशामक विभागास संबंधित ठिकाणी दाखल होणे अनिवार्य असल्याने त्या ठिकाणी पोचल्यानंतर कॉल खोटा असल्याचे निदर्शनात येत असते. तर बऱ्याच वेळा अनेक व्यक्ती केवळ टाइमपास म्हणून कार्यालयात फोन करत असतात. त्यामुळे फोन बिझी येतो आणि महत्त्वाचे फोन टळले जातात. दैनंदिन अशा प्रकारचा त्रास जाणवत असतो.

"आगीच्या घटना घडणार नाही, याची सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. शिवाय अग्निशामक विभाग आपत्कालीन विभाग आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी खोटे कॉल करू नये. विभागाचे गांभीर्य लक्षात घ्यावे."

- श्याम राऊत, लिडींग फायरमन

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अशा आहेत घटना

औद्योगिक क्षेत्राचे संदर्भातील- १२

घरगुती, रहिवासी भागातील- ८४

मोकळ्या मैदानावरील गवत- १५७

वाहने- ५४

शॉर्टसर्किट- २९

व्यावसायिक, दुकाने- ५६

खत प्रकल्प कचरा- ०३

खोट्या घटना- ०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT