corona nashik
corona nashik 
नाशिक

CoronaUpdate : जिल्ह्यात नव्‍याने ४३० बाधित, तर ४३५ कोरोनामुक्‍त; चार रुग्णांचा मृत्‍यू 

अरुण मलाणी

 नाशिक : जिल्ह्या‍त नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्‍या आत असल्‍याने रुग्ण संख्येत संथ गतीने वाढ होत आहे. गुरूवारी (ता.२२) दिवसभरात ४३० कोरोना बाधित आढळून आले. ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, चार रुग्णांचा मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्यातील ॲक्‍टीव्‍ह रुग्ण संख्येत नऊने घट झाली असून, सद्यःस्थितीत ६ हजार ४३१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

गुरूवारी (ता. २२) नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २६०, नाशिक ग्रामीणचे १५४, मालेगावचे चौदा तर जिल्‍हाबाह्य दोन बाधित आढळून आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २४५, नाशिक ग्रामीणमधील १५१, मालेगावचे १९ तर वीस जिल्हाबाह्य रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक शहरातील एक, नाशिक ग्रामीणच्‍या तीन रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्या‍त ९१ हजार ००२ बाधित आढळून आले असून, यापैकी ८२ हजार ९४३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ६२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ७८४, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ५४, मालेगाव रुग्णालयांत आठ तर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार, जिल्‍हा रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ५९५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी २६० अहवाल नाशिक ग्रामीण तर २२८ अहवाल नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णांचे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT