Village deity Mohadamal Maharaj. esakal
नाशिक

Nashik News : धार्मिक एकोपा वृद्धींगत करणारा बोहाडा सुरू; धूमधडाक्यात विविध सोंगांसाठी गावकरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवदेवतांना साकडे घालून सर्वत्र पाऊस चांगला पडावा व सुखसमृद्धी लाभावी यासाठी शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पाच दिवसीय बोहाडा उत्सवाला मोहाडी (ता.दिंडोरी) येथे सुरवात झाली.

त्याची सांगता मंगळवारी (ता.२०) सकाळी नृसिंह अवताराने होईल. (5 day Bohada festival begins at Mohadi Dindori nashik news)

या निमित्त मोहाडीचे ग्रामदैवत मोहाडमल्ल मंदिरासमोर तेल जाळणे व देव देवतांची सोंगे नाचविणे असा मुख्य कार्यक्रम असतो. गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात व आपल्याला वंशपरंपरेने वाटून दिलेली मुखवटे- सोंगे नाचवतात. बोहाड्याची सुरवात गणपती आगमनाने होऊन शेवट नृसिंह अवताराने होतो.

यानिमित्ताने सामाजिक समतेची व एकात्मतेची अनोखी भावना ग्रामस्थ पाळतात. माळी समाजाकडे भीम बकासूर, आसळी, ध्रुव, गजासूर, पाकोळी व गवळणी, सुतार समाजाकडे देवी व सारजा- गणपती, ब्राह्मण समाजाकडे नारद व नृसिंह, धनगर समाजाकडे साती आसरा (सातअप्सरा), तेली समाजाकडे काट्या मारुती,

आदिवासी समाजाकडे महिषासूर, मासा व यम तर सोनार समाजाकडे एकादशी, दलित समाजाकडे झुटिंग, नाभिक समाजाकडे वीरभद्र, तेली समाजाकडे रावण, शिंपी समाजाकडे इंद्रजित, भैरव, खंडेराव, महादेव, पार्वती, मराठा समाजाकडे नकटवडी, वेताळ अशी परंपरागत सोंगे दिलेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्यांच्याकडे सोंगे नाहीत पण रामलीलेत उत्साहाने भाग घ्यायचा आहे अशा हौशी तरुणांसाठी अंधश्रद्धा उद्बोधक ध्वजपर्वणी, भूताळ्या, भगत, नाच्या हे सार्वजनिक ठेवलेले असतात. संबळाच्या तालावर नाचत व आपल्या करामती दाखवत सोंग मध्यभागी मोहाडमल्ल मंदिरासमोर आल्यावर लोहार- ब्राह्मण -ठा कूर संयुक्तपणे सबादनी म्हणजे सोंगांची किंवा त्या देवतेची ओळख व त्याने पुराणात केलेले कार्य सांगून लोकांचे उद्बोधन करणे.

दोन सोंगामधील वेळेत वाघ्या मुरळीच्या गाण्यांचा तसेच कथांचा कार्यक्रम होतो. गावातील वाघ्या मुरळीचे जथ्ये त्यात भाग घेतात.

बोहाडा कालावधीत मोहाडमल्ल महाराज मंदिराला मांडव टाकण्याचा मान माळी समाजाकडे, दीपमाळेला तेल टाकण्याचा मान आदिवासी समाजाकडे तर नैवेद्य देण्याचा मान धनगर समाजाकडे आहे. या काळात गावातील वातावरण भक्तीपूर्ण राहत असून यानिमित्ताने नोकरी धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेले लोक सहपरिवार गावी येतात व बोहाड्यात सक्रिय सहभाग घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधीपासूनच हिंदीत होतेय K DRAMAची कॉपी ! माणिक-नंदिनीची गाजलेली मालिका आहे 'या' सिरीजवर आधारित

Latest Marathi News Live Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Mappls : हायवेवर सिक्रेट स्पीड कॅमेरा कुठं आहे? गुगल मॅपपेक्षा भारी आहे 'हे' भारतीय App, जाणून घ्या महत्त्वाचं फीचर

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेतून ३ कोटींच्या सोन्याची बॅग लंपास; बडनेरा रेल्वे स्थानकावर सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का

Dhule Zilla Parishad : धुळे जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव! ५६ गटांची आरक्षण सोडत जाहीर, २८ जागांवर महिलांना संधी

SCROLL FOR NEXT