corona test 1_1.jpg
corona test 1_1.jpg 
नाशिक

जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णांत ५५ ने वाढ; तर उपचार घेताहेत 1 हजार ७०१ बाधित

अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण काही दिवसांपासून नियंत्रणात आले आहे. शनिवारी (ता. ९) सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहर, मालेगाव क्षेत्रात कोरोनामुळे एकही रुग्‍ण दगावला नसल्‍याची दिलासादायक बाब आहे. दिवसभरात २७३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २१६ होती. नाशिक ग्रामीणमध्ये दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ५५ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ७०१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात २७३ पॉझिटिव्‍ह, 
बरे झाले २१६, दोन मृत्‍यू 

शनिवारी नाशिक शहरातील १७९, नाशिक ग्रामीणमधील ७८, मालेगावचे सहा, तर जिल्‍हाबाहेरील दहा रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १३०, नाशिक ग्रामीणमधील ७८, मालेगावचे तीन, तर जिल्‍हाबाहेरील पाच बाधितांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सिन्नर आणि अंबासन (ता. बागलाण) येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार १८५, नाशिक ग्रामीणमध्ये ६६, मालेगावला ८, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक, जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयित दाखल झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्‍या २५९ रुग्‍णांना दिवसभरात बाह्यरुग्‍ण विभागात तपासणी करत वैद्यकीय सल्‍ला दिला. 

दरम्‍यान जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख १२ हजार २९३ झाली असून, यापैकी एक लाख आठ हजार ५८२ बाधितांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. आतापर्यंत दोन हजार दहा बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ६१३ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT