nashik crime news
nashik crime news esakal
नाशिक

Crime Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी 7 वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (२१, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे आरोपीचे नाव आहे. (7 years of hard labor in case of rape of minor girl Crime Update nashik Latest Marathi News)

दिंडोरी पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, आरोपी अनिल गायकवाड याने पीडित अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वर्षभर अत्याचार केले. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली होती.

यादरम्यान, पीडिता गर्भवती झाली. सहा महिन्यांचा गर्भ असताना पीडितेने स्त्री अर्भकास जन्म दिला, मात्र ते जन्मत: मृत होते. या प्रकरणी आरोपीविरोधात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ॲड. दीपशिखा भिडे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करीत सहा साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात गुन्हा शाबीत झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

SCROLL FOR NEXT