Nashik Corona Updates esakal
नाशिक

नाशिक : जिल्ह्याची ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण 8 हजारांच्‍या उंबरठ्यावर

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात दैनंदिन कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आठ हजरांच्‍या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गुरुवारी (ता.१३) जिल्‍ह्‍यात एक हजार ९२५ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. ८१४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. मृतांचा आकडा निरंक राहिला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एक हजार १११ ने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात सात हजार ८२४ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सरासरी एक हजाराने रोज वाढ होते आहे. गुरुवारी सर्वाधिक एक हजार ३६८ कोरोना बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात आढळले. तर नाशिक ग्रामीण भागातील ४२८ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावमध्येही कोरोनाचा फैलाव होऊ लागला असून, येथील ४७ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्‍हा बाहेरील ८२ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. मृतांची संख्या निरंक राहिल्‍याची दिलासादायक बाब आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार ५११ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार ८६३ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण भागातील आहेत. नाशिक शहरातील ५२१, मालेगावच्‍या १२७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

पॉझिटिव्‍हीटी दर 25.99 वर

जिल्‍ह्‍यात एकूण चाचण्यांमध्ये आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. गुरुवारी नाशिक जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर २५.९९ टक्‍के राहिला. यात सर्वाधिक २९.१९ टक्‍के पॉझिटिव्‍हीटी दर नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे. तर नाशिक ग्रामीणमधील १७.९२ टक्‍के पॉझिटिव्‍हीटी दर राहिला. मालेगावचा दर २४.३५ टक्‍के आहे.


ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या अशी -

नाशिक महापालिका क्षेत्र --- 6088

नाशिक ग्रामीण क्षेत्र --- 1284

मालेगाव महापालिका क्षेत्र --- 138

जिल्‍हा बाहेरील बाधित --- 314

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT