bribe case esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : डॉ. वैशाली पाटीलकडे मिळाले 81 तोळे सोने

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आरोग्य सेवकाचे मासिक वेतन काढण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्या बँकेच्या लॉकर आणि घरातून तब्बल ८१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. (81 tola of gold were seized from bank locker and house of dr Vaishali Patil nashik bribe crime)

दरम्यान, आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

बुधवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली होती. वैद्यकीय रजेवर गेलेला आरोग्यसेवक पुन्हा सेवेत रुजू झाला. त्यानंतरही वैशाली पाटील यांनी तक्रारदार आरोग्यसेवकाचे वेतन काढले नाही.

त्यामुळे त्याने वेतनाची मागणी केली असता, पाटील यांनी दोन आरोग्यसेवकांच्या माध्यमातून तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१० हजारांवर तडजोड झाल्यानंतर ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली पाटील हिच्यासह संजय रामू राव (४६), कैलास गंगाधर शिंदे (४७) यांना अटक केली होती.

दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली पाटील यांच्या घराची झडती घेतली असता घरातून १० तोळे सोने जप्त केले होते. तसेच, बँकेच्या लॉकरची माहिती मिळाली होती. सदरील लॉकर्समधूनही ७१ तोळे सोने असे, ८१ तोळे सोन्याचे घबाडच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.

तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT