mask
mask 
नाशिक

निष्काळजीपणा भोवला! मास्‍कविना फिरणाऱ्या १५६ जणांना ८७ हजार दंड; कैदेचीही शिक्षा 

अरुण मलाणी

नाशिक : कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय स्‍तरावर विविध सावधगिरीच्‍या उपाययोजना बंधनकारक केलेल्‍या आहेत. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. मात्र निष्काळजीपणाने फिरणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

दोन दिवसांत शहरातील १५६ नागरिकांवर कारवाई केली असून, न्‍यायालयाने त्यांना ८७ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरणाऱ्यास दोन दिवसांची साधी कैद अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांनी सुनावली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना, सर्वाधिक रुग्‍ण नाशिक शहरातून आढळत आहेत. शहरातील बाधितांची संख्या साठ हजारांच्‍या उंबरठ्यावर असताना यापैकी ५५ हजार ८२२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवर नियमांचे पालन करणे बंधनकारक केलेले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्‍कचा वापर करण्यासह सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मज्‍जाव केलेला आहे. तरीही काही जण नियमांकडे कानाडोळा करत आहेत. अशांविरोधात सध्या कारवाई सुरू आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांना शंभर रुपयांचे बक्षीस

अशा नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांनी शंभर रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यातून शहर परिसरात कसून तपासणी मोहीम राबविली जात असून, नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. या दोन दिवसांत तब्‍बल १५६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, न्‍यायालयाने त्‍यांना दंड सुनावला आहे. नियमांचे पालन करत सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT