Four wheeler damaged in an accident esakal
नाशिक

Nashik Accident News : घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात; 2 चारचाकीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : रोकडोबा परिसरातील असराची वेश येथे घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला. अपघातात दोन चारचाकीचे नुकसान झाले आहे.

तसेच, दुचाकीवर थांबलेले दोघे थोडक्यात बचावले. काही वेस परिसरात धावपळ उडाली होती. (Accident due to brake failure of garbage van nashik accident news)

नितीन पवार यांनी त्यांची चारचाकी (एमएच- १५- जीए- ७६७३) असराची वेस येथील गणपती मंदिर शेजारी उभी केलेली होती. शनिवार (ता. ३०) दुपारी महापालिका घंटागाडी (एमएच- १५- एफक्यू- ०१८९) जात असताना ब्रेक फेल झाले.

घंटागाडी श्री. पवार यांच्या चारचाकीसह शेजारी उभी असलेल्या चारचाकीला (एमएच- ०१- बीयू- ७६३८) जाऊन धडकली.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दुचाकी घेऊन उभे असलेल्या दोघांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी पळ काढला.

अचानक ब्रेक फेल झाल्याने परिसरात धावपळ उडाली. सुदैवाने रस्त्यावर अन्य कोणी नसल्याने जीवितहानी घडली नाही. इतर वेळी मुख्य रस्ता असल्याने नेहमी वर्दळ असते. पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT