Election : येथील बाजार समितीच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी (ता.२८) मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदानासाठी सौंदाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, निमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, झोडगे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मालेगाव येथील ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदीर या चार केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. (administrative system ready for election in market committee Malegaon polled at 4 centers on Friday nashik news)
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी अटीतटीचा मुकाबला होत आहे. २८ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी सौंदाणे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय केंद्रावर सोसायटी गटातील २२७ तर ग्रामपंचायत गटातील १८४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
निमगाव जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय केंद्रावर सोसायटी गटातील ३३४ तर ग्रामपंचायत गटातील २४६ मतदार मतदान करतील. झोडगे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर सोसायटी गटातील ५७४ तर ग्रामपंचायत गटातील ४७५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदीर मालेगाव या केंद्रावर सोसायटी गटातील ४६४ तर ग्रामपंचायत गटातील ३२७ मतदार मतदान करतील.
याच केंद्रावर व्यापारी / आडत गटातील सर्व एक हजार १२६ मतदार मतदान करतील. हमाल/ तोलारी गटातील सर्व २६१ मतदार देखील याच केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
मतदान कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता.२७) मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. संबंधित कर्मचारी दुपारपर्यंत मतदान केंद्रांवर पोचतील. शनिवारी (ता.२९) मतमोजणी होणार आहे.
नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयात सकाळी आठपासून मतमोजणीला सुरवात होईल. दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
"मतदारांनी मतदानाच्या वेळी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी निश्चित करून दिलेल्या १४ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. विना ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही. मतदान केंद्रांवर आवश्यक सोयी-सुविधा कार्यरत राहतील. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रात जातांना मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे."
- जितेंद्र शेळके, निवडणूक निर्णय अधिकारी, मालेगाव
या जागांसाठी निवडणूक
ग्रामपंचायत गटात एकूण ४ जागा -
सर्वसाधारण- २
अनुसूचित जाती जमाती - १
आर्थिक दुर्बल घटक - १
ग्रामपंचायत गट मतदार संख्या - १ हजार २३२
सोसायटी गट एकूण ११ जागा-
सर्वसाधारण- ७
महिला राखीव- २
इतर मागासवर्गीय- १
भटक्या जाती विमुक्त जमाती- १
सोसायटी गट मतदार संख्या - १ हजार ५८६
व्यापारी गट एकूण २ जागा -
एकूण मतदार - १ हजार १२६
हमाल मापारी एकूण जागा- १
एकूण मतदार - २६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.