Agrowon Exclusive Grape Expo started by Sakal Agrowon nashik news 
नाशिक

Nashik Grapes Exhibition : द्राक्ष पंढरीत ‘ॲग्रोवन’ द्राक्ष प्रदर्शनाची सुरवात; पिकाची माहिती एका छताखाली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Grapes Exhibition : द्राक्ष पंढरीतील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण माहिती, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाची एका छताखाली माहिती व्हावी म्हणून ‘सकाळ-ॲग्रोवन’तर्फे ‘ॲग्रोवन एक्सक्लुझिव्ह ग्रेप एक्स्पो’ची शानदार सुरवात झाली.

हे द्राक्ष प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत नाशिकमधील ठक्कर डोममध्ये खुले असेल. महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. (Agrowon Exclusive Grape Expo started by Sakal Agrowon nashik news)

पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार, ॲग्री सर्च इंडियाचे संचालक पंडित खांदवे, ऑर्चिड क्रॉप सायन्सचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गागरे, एशियन ॲग्रो टेक्नॉलॉजीसचे प्रतिनिधी संतोष वाघमारे, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘ॲग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले आदी उपस्थित होते.

द्राक्षबागांची सप्टेंबरअखेर गोडी बहर छाटणीला गती येत असते. याच पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत असल्याने द्राक्ष उत्पादक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रदर्शनात द्राक्ष उत्पादनसंबंधी कीड व रोग नियंत्रणासाठी विविध कृषी निविष्ठाची शृंखला, अद्ययावत सूक्ष्म सिंचन व फवारणी प्रणाली, द्राक्ष पीकसंबंधी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण यांत्रिकीकरणाची मांडणी करण्यात आली आहे.

प्रदर्शनात मोफत पाणी परीक्षण शिबिर व लगेच तपासणी अहवाल यांसह प्रदर्शनाला भेट देणाऱ्यास ‘लकी ड्रॉ’द्वारे भेटवस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिकसह नगर, पुणे, धुळे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पूर्वा केमटेक आहेत.

प्रदर्शन पॉवर्ड बाय ऑर्चिड कंपनी आहे. सहप्रायोजक ॲग्री सर्च (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आनंद ॲग्रो केअर, एशियन ॲग्री टेक्नॉलॉजिस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, बायस्टॅड इंडिया लिमिटेड, गोदावरी ॲग्रो, वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, शक्तिमान या कंपन्या आहेत. प्रदर्शनात वितरित होणारी बक्षिसे नाशिकच्या सोनी गिफ्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रायोजित आहेत.

शिवसेना शेतकरी संवाद दौऱ्याची प्रदर्शनाला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची शेतकरी संवाद यात्रा राज्य दौऱ्यावर आहे. त्यानिमित्ताने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी भेट देत प्रदर्शनाची माहिती घेतली. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. एस. डी. सावंतांचे चर्चासत्रात आज मार्गदर्शन

द्राक्ष पिकासंबंधी रविवारी (ता. १) आणि सोमवारी (ता. २) प्रदर्शनात चर्चासत्रे होतील. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा व त्यावर उपाय देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे. रविवारी (ता. १) दुपारी बाराला द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत हे ‘गोड्या छाटणीनंतरचे नियोजन व रासायनिक अवशेष व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

"द्राक्ष पिकामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. द्राक्ष उत्पादकांची गरज ओळखून ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आगळेवेगळे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरवातीलाच उपयुक्त ठरणार आहे." - कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ

"कृषी निविष्ठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत प्रदर्शनात भारतीय बनावटीची गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याची माहिती घेऊन पुढील हंगामाचे नियोजन करण्यात मोठी मदत होईल." - नारायण आव्हाड, शेतकरी, मुखेड, ता. येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT