exam esakal
नाशिक

Ashram School Exam : चाचणी परीक्षेत सरासरी 85 टक्के आदिवासी विद्यार्थी उत्तीर्ण; गुणवत्तावाढीसाठी चाचणी

सकाळ वृत्तसेवा

Ashram School Exam : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गत महिन्यात घेण्यात आलेल्या क्षमता चाचणीचा निकाल जाहीर झाला आहे.

यंदा झालेल्या विद्यार्थी क्षमता चाचणीमध्ये निकालात वाढ झाल्याचे दिसून आले असून, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या परीक्षेचा सरासरी निकाल ८५ टक्के लागला आहे. गत वर्षी हा निकाल केवळ ५५ टक्के लागला होता.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. (An average of 85 percent tribal students passed test in ashram school nashik news)

यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विद्यार्थ्याची अध्ययन पातळी समजून घेऊन त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी परीक्षा घेतली जात आहे. गत शैक्षणिक वर्षात १७ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात आली होती.

त्या वेळी गणित आणि इंग्रजी या विषयांच्या परीक्षेचा सरासरी निकाल ५५ टक्के लागला होता. या परीक्षेच्या निकालानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक आराखड्यात बदल, तसेच दैनंदिन अध्यापनात बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाची शैक्षणिक वर्षातील परीक्षा ही २९ ऑगस्ट २०२३ ला घेण्यात आली होती.

राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत एकाच वेळात ही परीक्षा झाली होती. यंदाच्या विद्यार्थी क्षमता चाचणी निकालात वाढ दिसून आली आहे. गणित आणि इंग्रजी या विषयांच्या परीक्षेचा सरासरी निकाल ८५ टक्के इतका लागला आहे.

विद्यार्थ्यांच्या धर्तीवर शिक्षकांची परीक्षा

विद्यार्थी क्षमता चाचणीमध्ये गुणात्मक वाढ झाली. याच धर्तीवर आदिवासी शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची प्राथमिक ज्ञानावर आधारित १०० गुणांची चाचणी होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, विषय ज्ञान वाढविण्याची, तसेच स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी, तसेच अध्ययन- अध्यापनातल्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना आणि उपक्रम आखता यावेत, असा व्यापक उद्देश आहे.

१७ सप्टेंबर २०२३ ला राज्यभरातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी क्षमता चाचणी होईल. या परीक्षेकरता तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता पहिली ते सातवी, दुसरा गट आठवी ते दहावी, तिसरा गट इयत्ता अकरावी व बारावी कला व विज्ञान असे आहेत.

सदर क्षमता चाचणी १०० गुणांची असणार आहे. सदर क्षमता चाचणीच्या निकालावरून कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार नाही. या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांना अद्ययावत विषय ज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे, हे ठरविण्यात येणार आहे.

"क्षमता चाचणीमुळे विद्यार्थी कुठे मागे पडत आहेत, हे समजण्यास मदत झाली. त्यामुळे विविध उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षात राबविता आले आणि गुणवत्तावाढ होते आहे, हे निदर्शनास आले. याच धर्तीवर शिक्षक क्षमता चाचणी घेऊन त्यावर आधारित मूल्यमापन करून शिक्षकांसाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण राबविण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्याची गुणवत्तावाढ, हा व्यापक उद्देश यामागे आहे." -नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT