Gangadharan D esakal
नाशिक

दिव्यांग प्रमाणपत्र, वैश्‍विक ओळखपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी करा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त२७ जुलैपर्यत जिल्हा प्रशासनामार्फत अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रासाठी संगणकीय नोंदणी सुरू आहे. यासाठी अद्यापही नोंदणी न झालेल्या दिव्यांगांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ५८९ दिव्यांगांनी ऑनलाइन प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार १५ तालुक्यांतील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली अभियानासाठी दिव्यांगांची ऑनलाइन नोंदणी मोहीम होत आहे.

‘यूडीआडी’ पोर्टलवर प्रलंबित अर्जाचा निपटारा करणे, मॅन्युअली दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त दिव्यांग व्यक्तींची ‘यूडीआडी’ कार्ड घेण्यासाठी पोर्टलवर नोंद करणे व ४० किंवा ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीस अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्यास त्याची www.swavlambancard.gov.on या संकेतस्थळावर नोंदणी करणे, या तीन बाबींवर प्रामुख्याने कामकाज सुरू आहे.

सदर कार्यक्रम महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावरही राबविण्यात येणार आहे. यासाठी नाशिक महापालिका व मालेगाव यांना प्रत्येकी ५ हजार, प्रत्येक पंचायत समितीस १ हजार ५००, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत व कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रत्येकी १ हजार ५०० इतके दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र ऑनलाइन नोंदणी उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT