Oxygen Plant SYSTEM
नाशिक

मालेगावात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीसाठी पावणेतीन कोटी मंजूर

मालेगाव शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी (Oxygen Plant) दोन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) व कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

...सोबत या अत्यावश्यक सुविधा मिळणार

मालेगाव शहरात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती प्लांट, ऑक्सिजन सिलिंडर हेल्थ एटीएम मशीन व इतर बाबींसंदर्भात चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन प्लांटसाठी निधी मंजूर करण्यात आला. याखेरीज मालेगावसाठी रोज १५० ऑक्सिजन सिलिंडर भरुन मिळतील. दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध होणार आहेत. दोन हेल्थ एटीएम मशीन खरेदीसाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, या मशिनद्वारे ४० प्रकारच्या शारीरीक तपासण्या करण्यात येतील. तसेच, आरटीपीसीआर प्रयोगशाळा मालेगाव येथे उभारण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, नाशिक पोलिस आयुक्त दिपक पांण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर निलेश आहेर, विनोद वाघ, संजय घोडके, शशिकांत अमृतकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: धान्य पाकिटात झुरळे अन् किचनमध्ये अस्वच्छता! झेप्टो, ब्लिंक कॉमर्स, आईस्क्रीम हाऊससह प्रसिद्ध हॉटेल्सवर FDAची कारवाई

IND vs NZ: शुभमन गिलचा असा अवतार कधी पाहिलाय का? विकेट गेल्यावर नाचला, रनआऊट हुकल्यावर चिडला; पाहा Viral Video

El Niño Winter 2026 : एल निनोचा हिमालयाला मोठा तडाखा बसण्याची शक्यता; भारत, नेपाळ, पाकिस्तानसह अफगाणिस्तानलला अतिवृष्टी, हिमस्खलनाचा धोका

Latest Marathi News Live Update: शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड

Solapur Sugarcane Rate: सोलापूरच्या ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! ३२५० रुपयांची पहिली उचल, कारखानदारांचा ३४५० रुपयांचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT