chandra grahan 2022
chandra grahan 2022 esakal
नाशिक

Chandra Grahan 2022 : ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमी चंद्रगहणाच्या आविष्कारापासून वंचित!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खगोलीय आविष्कार चंद्रग्रहणाची अनुभूती घेण्यासाठी खगोलप्रेमींनी जय्यत तयारी केलेली होती. परंतु मंगळवारी (ता. ८) शहरातील बहुतांश क्षेत्रातील आकाशाचे पूर्वेकडील क्षीतिज ढगाळ वातावरणामुळे झाकोळले होते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्‍या आविष्कारापासून वंचित राहावे लागल्‍याने खगोलप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला होता. (Astronomy lovers deprived of experiencing Chandra Grahan due to cloudy weather Chandra Grahan 2022 Nashik News)

गेल्‍या महिन्‍यात झालेला सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्‍साह बघायला मिळाला. त्‍यासाठी विशेष तयारीदेखील करण्यात आली होती. त्‍यापाठोपाठ मंगळवारी आलेला खंडग्रास चंद्रग्रहणाची अनुभूती घेण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहता येणार असल्‍याने तशी तयारीदेखील केलेली होती. खगोलप्रेमींनी सायंकाळच्‍या वेळी गच्ची, उंच इमारतीवरील ठिकाण गाठताना ग्रहणाची अनुभूती घेण्याचा प्रयत्‍न केला.

खगोलशास्‍त्राची आवड असलेल्‍या विद्यार्थी, युवकांच्‍या समूहांनी शहरानजीकच्‍या कमी वर्दळीच्‍या ठिकाणी ठाण मांडतांना ग्रहण अनुभवण्याचा बेत आखला होता. काहींनी दुर्बीण स्‍वत:सोबत बाळगताना निरीक्षण सुरू ठेवले होते. मर्यादित वेळेसाठी ग्रहण दिसणार असल्‍याने खगोलप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल होते. परंतु, या वेळी आकाशातील बहुतांश भाग ढगांनी दाटला गेल्‍याने ऐन ग्रहणाच्‍या कालावधीत चंद्र ढगांखाली झाकोळला गेला. त्‍यामुळे या खगोलीय घटनेच्या अनुभूतीपासून नागरीकांना वंचित राहावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत वादळ अन् मुसळधार पाऊस; मेट्रो बंद, विमान उड्डाणं वळवली

दारुचे व्यसन अन् ED मागे लागलेल्या नेत्याला निवडून देऊ नका; अण्णा हजारेंचा केजरीवालांवर बोचरा वार

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT