crime news  esakal
नाशिक

नाशिक : शेताच्या वादातून सावत्र भावावर हल्ला; चाकूने पाठिवर वार

या कुटुंबात जमीन क्षेत्राच्या मालकीवरून असलेला वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेताचा वाद न्यायालयात सुरू आहे, तोपर्यत जमिनीची नांगरणी करू नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या सोपान बाबूराव झाडे (रा. वडाळीभोई, ता.चांदवड) यांच्यावर सावत्र भावाने चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात झाडे हे गंभीर जखमी झाले असून पिंपळगावच्या खासगी रूग्णालयात ते उपचार घेत आहे. (Attack on step brother due to farm dispute in Nashik)

पोलिसांनी दिलेले माहिती अशी,

वडाळीभोई येथे सोपान झाडे व एकनाथ झाडे यांच्या कुटुंबात गट क्रमांक २०२७ मधील जमीन क्षेत्राच्या मालकीवरून असलेला वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शनिवारी (ता.१४) रात्री आठच्या सुमारास हे क्षेत्र नांगरिणीसाठी एकनाथ बाबूराव झाडे, बाळासाहेब बाबूराव झाडे, शरद बाजीराव जाधव, रमेश बाजीराव जाधव, सागर विजय जाधव हे आले. न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नसल्याने जमीन नांगरणी करू नका अशी विनंती सोपान झाडे यांनी केली. त्यावर एकनाथ झाडे व इतर चुलतभाऊ, पुतणे यांनी सोपान झाडे यांना शिविगाळ केली. एकनाथ झाडे यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूचे वार पाठीवर झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या सोपान झाडे यांना चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी पिंपळगावच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. हल्ला करणाऱ्यांविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस हवालदार मच्छिंद्र कराड तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

AFG vs BAN : अफगाणिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! वन डे क्रिकेटच्या इतिहासात असा विजय मिळवणारा जगातील एकमेव संघ

Silver Price Today: दिवाळीपूर्वी चांदीने 2 लाखांचा टप्पा ओलांडला; एकाच दिवसात 10,000 रुपयांची वाढ

Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT