bajari should be procured at a guaranteed price nashik marathi news 
नाशिक

हमीभावाची बाजरी खरेदी टाळल्यास जिल्ह्याला ३०० कोटींचा झटका!; वाचा सविस्तर

संतोष विंचू

नाशिक/येवला : उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भाव यामुळे एकेकाळी जिल्ह्यातले प्रमुख पीक असलेल्या बाजरीकडे शेतकरी आता कानाडोळा करू लागले आहेत. बाजरीच्या घाट्याच्या गणितामुळे अनेक शेतकरी आता बाजरीऐवजी मका व कपाशीचे पीक घेत असल्याने यंदा केवळ ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या बाजारभाव व हमीभावात हजाराहून अधिक भावाचा फरक असल्याने हमीभावाने बाजरी खरेदी न झाल्यास जिल्ह्याला सुमारे ३०० कोटींचा झटका बसणार असल्याचे चित्र आहे. 

शेतकरी बाजरी नकोच

जिल्ह्यात दोन दशकांपूर्वी कांद्याबरोबर बाजरी हेच मुख्य पीक खरिपात घेतले जायचे. या पिकाला १९९० च्या दशकात कपाशीचा, तर मागील दहा-बारा वर्षांत मक्याचा पर्याय मिळाल्याने आता शेतकरी बाजरी नकोच या निर्णयाप्रत आले आहेत. बाजरीचे पीक घेऊन, त्या शेतात पुढे कांद्याचे पीक घेता येते. मात्र मक्याच्या पिकातही कांदालागवड शक्‍य असल्याने व मक्याचे उत्पादनही भरमसाट असल्याने आता मक्याला प्राधान्य दिले जात आहे. एकेकाळी येवला, नांदगावमध्ये बाजरीचे क्षेत्र ३५ ते ४५ हजार हेक्टरपर्यंत असायचे. तेच आता दहा-बारा हजार हेक्‍टरवर आले आहे. निफाड, दिंडोरीसारख्या बागायती तालुक्यांनी तर खरिपातील बाजरी घेणे सोडून दिले आहे. मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड, सटाणा व नांदगाव परिसरातही बाजारीचे क्षेत्र घटत चालले आहे. दरम्यान, बाजरीला केंद्र सरकारने दोन हजार १५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात प्रत्येक वर्षी एक हजार ते एक हजार २०० रुपयांचा भाव मिळत मिळतो. यामुळे हमीभावाने बाजरी खरेदीची मागणी शेतकरी करीत आहेत. 

१० ते १२ वर्षांपासून बाजरीच्या मुख्य पिकाला उत्पादन खर्चावर योग्य भाव न मिळाल्याने तोट्यात जात असल्याने बाजरीचे अल्प प्रमाण झाले आहे. बाजरीऐवजी कपाशी व मका पिकाकडे कल आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने खरेदी व्हावी. 
-भागुनाथ उशीर, बाजरी उत्पादक, सायगाव 

जिल्ह्यातील बाजरीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
तालुका - क्षेत्र - पेरणी - टक्के 
येवला - १०,८५१ - ८,६७२ - ८० 
मालेगाव - २३,९११ - १५,९८४ - ६७ 
सटाणा - १९,८५१ - १९,००९ - ९५ 
कळवण - ८,७४३- ३,००७ - ३४ 
देवळा - ८,७३५ - ९,०८७ - १०४ 
नांदगाव - १८,४२९ - १२,१५२ - ६६ 
निफाड - ३६८- ७५ - २० 
सिन्नर - १७,३७१ - ११,२७७ - ६५ 
चांदवड - ९,२३८ - ५,३११ - ५७ 
एकूण - १,१७,५०४ - ८४,५८५- ७२ 

० बाजरी पिकाचे सध्याचे एकरी गणित 
- नांगरटी : १,४०० रुपये 
- चिरखडी : ७०० 
- पेरणी : ७०० 
- बी : ५०० 
- कोळपणी : ७५० 
- निंदणी : १,५०० 
- खत : २,५०० 
- सोंगणी : ५,५०० 
- थ्रेशर खर्च : २,६०० 
- मार्केट वाहतूक : १,३०० 
- एकूण खर्च : १७,४५० 


० एकरी सरासरी उत्पादन : ३२.५ क्विंटल (एकरी -१३ क्विं.) 
० आजचा बाजारभाव : १००० ते १२०० 
० हेक्टरी उत्पादन खर्च : ४३,६२५ रुपये 
० हेक्टरी आजच्या भावाने उत्पन्न - ३२.५ x १०५० सरासरी भाव : ३४,१२५ रुपये 
० हेक्टरी हमीभावाने खरेदी झाली तर मिळणारे उत्पन्न : ६९,८७५ रुपये 
० हमीभाव २,१५० रुपयाने खरेदी न झाल्यास होणारे हेक्टरी नुकसान : ३५,७५० रुपये 
० हमीभाव न मिळाल्यास जिल्ह्यातील ८४,५८५ हेक्टरवर होणारे नुकसान : ३०२ कोटी रुपये 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT