Balasaheb Thorat esakal
नाशिक

Balasaheb Thorat News: काँग्रेसचे भवितव्य ठरविणार पदयात्रा : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

Balasaheb Thorat News : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सर्व आघाड्यांवर अनुत्तीर्ण झाले आहे. आगामी काळात आता केवळ धार्मिक तेढ वाढवून मतांची पोळी भाजण्याचे काम त्यांच्याकडून होईल.

भाजपच्या नऊ वर्षांतील कार्यकाळातील अपयश सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी लोकसंवाद पदयात्रा काँग्रेसकडून राज्यभर काढली जाणार आहे.

त्यामुळे लोकसंवाद पदयात्रा काँग्रेससह कार्यकर्त्यांचे भवितव्य ठरविणारी असल्याने प्रत्येकाने झोकून कामाला लागावे, असे आवाहन विधिमंडळाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना केले. (Balasaheb Thorat statement Padayatra will decide fate of Congress nashik political)

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात असलेल्या लोकभावनेचे समर्थन करण्यासाठी व त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान लोकसंवाद पदयात्रा काढली जाईल.

यात उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (ता. २३) थोरात यांच्या उपस्थितीत झाली.

या वेळी ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्र समन्वयक शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, लहू कानडे, पक्ष निरीक्षक उल्हास पाटील, माजी खासदार बापू चौरे, प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शाहू खैरे, शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्यासह धुळे, नंदुरबार, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यांचे अध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की आज प्रत्येक जण सांगत आहे, की काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे पदयात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची आहे. यासाठी लागणारे नियोजन प्रत्येक जिल्ह्याने सूक्ष्मपणे करावे.

तत्पूर्वी, प्रत्येक जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी पदयात्रेबाबत सूचना मांडल्या. उत्तर महाराष्ट्र समन्वयक आहेर यांनी प्रास्ताविकात पदयात्रेची उद्दिष्टे सांगत आराखडा मांडला. प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांनी पदयात्रेच्या नियोजनाची माहिती दिली.

बैठकीस माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, मालेगावचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग, दिगंबर गिते, रमेश कहांडोळे, अॅड. संदीप गुळवे, स्वप्नील पाटील, राजेंद्र बागूल, उल्हास सातभाई, सुभाष देवरे, लक्ष्मण जायभावे, बबलू खैरे, उद्धव पवार, विजय राऊत, जयेश पोकळे, स्वाती जाधव, वंदना पाटील, निर्मला खर्डे, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रदेश पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

पदयात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांवर टाकली. उत्तर महाराष्ट्रात प्रदेश पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याला यात्रेची जबाबदारी घ्यावी लागेल. पदयात्रेतील कामांचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...अन ध्वनिक्षेपक झाले बंद

पदयात्रेबाबत प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष व शहराध्यक्ष आपली मते मांडत होते. यात नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे बोलण्यास उभे राहिले असता, ध्वनिक्षेपकच बंद झाले. ध्वनिक्षेपक सुरू करण्याचा खटाटोप सुरू होता.

तब्बल पाच ते सहा मिनिटे हा खेळ सुरू होता. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आवाजही असाच बंद झाल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये झाली. खूप प्रयत्नानंतर अखेर ध्वनिक्षेपक सुरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT