Balasaheb Thorat Taunting Statement On Eknath Shinde esakal
नाशिक

Balasaheb Thorat Statement : आत्मविश्वास डगमगला की ज्योतिष आठवतो

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राजकारणात हात दाखवणे व हात वर करून दाखवणे यात फरक आहे. तुम्ही काम नाही केलं तर जनता हात दाखवते. एकदा आत्मविश्वास डगमगला, की हे सर्व उद्योग सुरू होतात, असा खोचक टोला राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सिन्नरमधील एका ज्योतिषाला भेटून हात बघितला, अशी चर्चा आहे. घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा दावा करत अनेकांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीवर टीका होत आहे.(Balasaheb Thorat Taunting Statement On Eknath Shinde in Press Meet

Nashik News)

माजी मंत्री थोरात यांनी देखील या विषयावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. ते म्हणाले, मी अजूनपर्यंत कोणाला हात दाखवलेला नाही. मी परमेश्वराच्या तत्त्वाला मानतो. संकट समोर आल्यावर किंवा आत्मविश्वास डगमगल्यानंतर असे उद्योग सुरू होता. काम नाही केलं आणि फक्त हात दाखवत फिरले तर जनता नक्कीच हात दाखवते.

निसर्गामध्ये कुठलीतरी शक्ती आहे त्याला मी परमेश्वर मानतो. सगळ्यांचा परमेश्वर एकच आहे. तपास यंत्रणांच्या कारवाई संदर्भात बोलताना ते म्हणाले, राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा उपयोग होत आहे ही बाब आता सर्वसामान्यांना समजू लागले असून, स्वायत्त संस्थांनी देशात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने राजकारणासाठी या संस्थांचा उपयोग होत आहे. विरोधात कोणी बोलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या संस्थांचा उपयोग केला जातो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे उदाहरण देताना त्यांनी आरोप केला.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मूळ प्रश्नांकडून लक्ष विचलित

सध्या देशात महागाई व बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे अशा प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी भाजपचे नेते वेगळे प्रयोग करत असतात. कोणी महाराष्ट्र कर्नाटकचा जुना प्रश्न उकरून काढतात, राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतात, या माध्यमातून भाजपचे नेते महाराष्ट्राच्या मानबिंदूवर आघात करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

SCROLL FOR NEXT