An SMS is sent by Cyber ​​Bhamtya that the money has been transferred in this way. In this, the first SMS is one rupee and the second one is Rs 25,000. ` esakal
नाशिक

Nashik Cyber Crime : पैसे ट्रान्स्फरच्या SMS पासून सावधान! सायबर भामट्यांचा गंडा घालण्याचा नवीन फंडा

आपल्या मोबाईलवर पैसे ट्रान्स्फरचा एसएमएस आला तर तो काळजीपूर्वक वाचवा, अन्यथा आपलीच मोठी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी सातत्याने जनजागृती, प्रबोधन केले जाते. त्याचे सकारात्मक परिणाम होत असताना सायबर भामटे मात्र ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन फंड्यांचा वापर करीत आहेत.

आता तर थेट स्मार्ट फोन वापरणाऱ्यास पैसे ट्रान्स्फर केल्याचा टेक्स्ट मेसेज (एसएमएस) पाठवून गंडा घालण्याचा प्रकार सुरू केला आहे. पैसे आल्याचा एसएमएस पाहून अनेकदा नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे आपल्या मोबाईलवर पैसे ट्रान्स्फरचा एसएमएस आला तर तो काळजीपूर्वक वाचवा, अन्यथा आपलीच मोठी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. (Beware of Money Transfer SMS new trick of cyber criminals Nashik fraud ​​Crime)

संशयित सायबर भामटे नवनवीन फंड्यांचा वापर करून गंडविण्याची शक्कल लढवत आहे. संशयित सायबर भामटा सावज हेरून त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधतो. आपल्याच ओळखीतले नाव सांगून, ‘माझे फोन पे लॉक झाले आहे.

तुमच्या ‘फोन पे’वर २५ हजार रुपये ट्रान्स्फर करतो. त्यानंतर मी सांगेल त्या मोबाईलवर त्यातली काही रक्कम ट्रान्स्फर करा’, असे बोलताना तो समोरच्या व्यक्तीचा विश्वासही संपादन करतो.

परत काही क्षणात फोन करून, ‘ एक रुपया ट्रान्स्फर केला आहे, आला का पाहा’. सावज असलेल्या व्यक्तीचा मोबाईलवर टेक्स्ट मेसेज (एसएमएस) आलेला असतो. तो व्यक्तीही बँक खाते न पाहता मेसेज पाहून ‘हो’ सांगतो.

पुन्हा तसाच एसएमएस येतो, त्यावर २५ हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसते. सायबर भामटा पुन्हा फोन करतो आणि ‘२५ हजार रुपये ट्रान्स्फर झाले आहे, त्यातील १० हजार रुपये मी पाठविलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘फोन पे’ने पाठवा’ अशी विनंती करतो.

अशावेळी जर सावज असलेल्या व्यक्तीने बँक खाते न पाहता सायबर भामट्याने पाठविलेला एसएमएस खरा मानून त्याने पाठविलेल्या मोबाईल क्रमांकावर १० हजार रुपये ट्रान्स्फर केले तर तुमची फसवणूक झालीच समजा.

हुबेहुब एसएमएस

सायबर भामट्याकडून जो एसएमएस येतो, तो अगदी खराखुरा वाटावा असाच असतो. फक्त ज्या ठिकाणी आपले बँकेचे अकाऊंटचा क्रमांक असतो, त्या ठिकाणी त्याने ज्यावरून फोन केलेला असतो तो क्रमांक असतो.

हुबेहुब एसएमएस पाहून मोबाईलधारकाची फसगत होते. पैसे ट्रान्स्फर होताना आपल्या खात्यातही पैसे जमा होतात. सावधगिरी बाळगताना आपले बँक खातेही पाहून घेतले पाहिजे.

अशी बाळगा सावधगिरी

- एसएमएस आला तर तो काळजीपूर्वक वाचा

- बँक खात्यावर पैसे जमा झाल्याची खात्री करा

- अनोळखी मोबाईलवरून फोन आल्यास खातरजमा केल्यानंतरच विश्वास ठेवा

- मोबाईलवर आलेली अनोळखी लिंक ओपन करू नका

- ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी कोणालाही देऊ नका

"ऑनलाइन आर्थिक व्यवहार करीत असताना कोणत्याही आमिषांना बळी पडू नका. खातरजमा झाल्याशिवाय ऑनलाइन आर्थिक व्यवहार टाळा."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT