Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : स्वतःच्याच गोडाऊनला मालकाने लावली आग; बनाव उघड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : स्वतःच्या गोडाऊनला आग लागल्याचा बनाव भद्रकाली पोलिसांनी उघड केला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून गोडाऊन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बबलूसिंग परदेशी, असे गोडाऊन मालकाचे नाव आहे. (Bhadrakali police exposed fraud by owner of fire at its own godown nashik crime news)

बबलूसिंग परदेशी यांचे पिंपळ चौक येथे रसूलबाग कब्रस्तानच्या मागील बाजूस गोडाऊन आहे. त्यात जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या. २४ मेस रात्री सव्वा दोनच्या सुमारास गोडाऊनला आग लागून नुकसान झाले होते.

अग्निशामक विभागास माहिती मिळताच त्यांनी वेळेवर दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. परिसरातील नागरिकांनी आग लागली नसून कुणीतरी लावले असल्याची शक्यता व्यक्त केली. याबाबत परिसरातील रहिवाशांनी भद्रकाली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकशीची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या वेळी घटनास्थळास भेट दिली होती. पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२४ मेस एक जण हातात दोन पिशव्या घेऊन जात असताना आढळून आला. त्यानंतर परतत असताना त्याच्याकडे पिशव्या दिसून आल्या नाही.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज परिसरातील नागरिकांना दाखवून खात्री केली. तसेच बबलूसिंग परदेशी यासही फुटेज दाखवण्यात आले. त्यात दिसणारा व्यक्ती ते स्वतः असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

परदेशी यांनीच आग लावल्याची खात्री झाल्याने शनिवारी (ता.१०) भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या तक्रारीवरून परदेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेत जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT