Nashik News  esakal
नाशिक

World Record : भाग्यश्री धर्माधिकारींचा अनोखा विक्रम; गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : येथील आयबीटी इन्स्टिट्यूटच्या संस्थापक भाग्यश्री धर्माधिकारी (Bhagyashree Dharmadhikari) यांनी गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड २०२३ पूर्ण केले आहे. (Bhagyashree Dharmadhikari recorded 64 makeup in 8 hours in Guinness Book of World Records nashik news)

आठ तासांमध्ये ६४ मेकओव्हर (मेकअप) त्यांनी न थांबता केले. सकाळी अकरा ते सातपर्यंत आठ तासात ६४ मेकअप केल्यामुळे त्यांची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

मेकअपचे नवनवीन रेकॉर्ड गीनिज बुकात नोंद झालेले आहे. या आधी नवसारी येथील पूजा देसाई हिने १५ सप्टेंबर २०१९ ला आठ तासात ५५ मेकअप केले आहे. गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड त्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मात्र, नाशिक रोड येथील आयबीटी इन्स्टिट्यूटच्या संस्थापक भाग्यश्री धर्माधिकारी यांनी आठ तासांमध्ये ६४ मेकअप करण्याचा विक्रम नोंदवला आहे. नाशिक रोड येथील हॉटेल सेलिब्रेटा येथे हा कार्यक्रम पार पडला. गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे विविध जज या ठिकाणी उपस्थित होते.

रवी जोशी, मानसी देशपांडे, के. बी. जयप्रकाश, आदित्य धिवर, सोनल मालाणी, देविका शर्मा, पूनम शेलार यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर यावेळी महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, गौरव धर्माधिकारी, सुरेंद्र धर्माधिकारी, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, उद्योजक दिनेश चांदे ,संपदा हिरे हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT