Divisional Commissioner Radhakrishna Game while releasing the information booklet of Nima Power exhibition on Monday esakal
नाशिक

NIMA Power : ‘निमा पॉवर’मुळे नाशिकमध्ये मोठे उद्योग येणार : राधाकृष्ण गमे

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : नाशिकमध्ये मोठे उद्योग यावेत आणि इलेक्ट्रिकल उद्योगाचे मोठे हब व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असून, येत्या १९ ते २२ मेपर्यंत ‘निमा पॉवर एक्झिबिशन- २०२३’ होणार आहे. यामुळे भविष्यात नाशिकमध्ये मोठे उद्योग येतील, असा विश्‍वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येथे व्यक्त केला. (Big industry will come to Nashik due to NIMA Power Radhakrishna Game nashik news)

श्री. गमे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ३) निमा हाऊस येथे एक्झिबिशनचे बोधचिन्ह आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र अहिरे, निमा पॉवर कमिटीचे अध्यक्ष मिलिंद राजपुत, विद्युत निरीक्षक भागवत उगले आदी व्यासपीठावर होते.

श्री. गमे म्हणाले, की पायाभूत सुविधा पुरविल्यास औद्योगिक विकास होतो. उद्योग क्षेत्रात अव्वल क्रमांक टिकविण्यासाठी आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी मोठ्या जागेची गरज आहे. नाशिक-पुणे आणि सुरत-चेन्नई रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या कामास गती मिळाली आहे.

त्याचवेळी कुंभमेळ्याचे नियोजन सुरू असून, स्मार्ट सिटी प्रकल्पात ग्रीन फिल्डमध्ये प्रदर्शन केंद्रासाठी भव्य जागा आणि अन्य बाबींचा अंतर्भाव होता, याचीही आठवण गमे यांनी या वेळी करून दिली. निमा पॉवरचे अध्यक्ष श्री. राजपूत यांनी प्रदर्शनच्या आयोजनाची माहिती दिली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दिल्लीच्या धर्तीवर नाशिकमध्ये प्रदर्शनासाठी मोठे मैदान हवे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. कामगार उपायुक्त विकास माळी, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, बीओटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोपाळे, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, शशांक मणेरीकर, खजिनदार विरल ठक्कर, गोविंद झा, डी. जी. जोशी, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी, वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे, जितेंद्र आहेर, मनीष रावळ, श्रीकांत पाटील, रवी शामदासानी, एस. के. नायर, सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, सतीश कोठारी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, मधुकर ब्राह्मणकर, संजीव नारंग, चेंबरचे संजीव शाह आदी उपस्थित होते.

प्रदर्शनासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिल्याबद्दल बाळासाहेब जाधव, मंगेश काठे, मारुती कुलकर्णी, राजेंद्र वडनेरे, रवींद्र झोपे, विरल ठक्कर, व्यंकटेश मूर्ती, महेकर, आशिष नहार, राजेंद्र व्यास, प्रकाश ब्राह्मणकार, विवेक गोगटे, ज्ञानेश देशपांडे, प्रशांत जोशी, ललित बूब आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT