Death News esakal
नाशिक

Nashik Accident News : कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : दिंडोरी रोडवर शुक्रवारी (ता. ६) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरीहून निघालेला सिमेंट कंटेनर (एमपी- ०९- एचएच- ९३७८) इंदूरकडे चालला होता. दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथील अंकुर साडीसमोर या सिमेंट कंटेनर डाव्या बाजूकडील मागील चाकाखाली एक दुचाकीचालक (एमएच- १५- जीजे- ३९२६) आला. (Bike rider died on the spot in accident container crushed the biker Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

यात दुचाकीचालक किरण महादू जाधव (७२, रा. गुलमोहरनगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्यासमवेत सहाय्यक निरीक्षक विनायक आहिरे, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या वेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी सिमेंट कंटेनर चालक अर्जुनसिंग प्रीतमसिंग चौधरी (४६, रा. मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले असून, कंटेनर जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT