Dinkar Patil vs Hemant Godse
Dinkar Patil vs Hemant Godse esakal
नाशिक

BJP vs Shinde Group: भाजपच्या लेखी खासदार गोडसे ‘गद्दार’! पोस्टर वॉरमुळे वादाची ठिणगी

सकाळ वृत्तसेवा

BJP vs CM Shinde Group : अनेक वर्षांपासून निवेदनाच्या माध्यमातून माध्यमांना सामोरे जाणारे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून इच्छुक असलेले महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार गोडसे गद्दार असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून झळकवल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टर वॉरच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाला नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा कायम ठेवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, हे यामुळे स्पष्ट झाले आहे. (BJP vs CM Shinde Group MP Godse traitor Poster War Sparks Controversy between dinkar patil hemant godse nashik political news)

दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्ट.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना युतीत यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने लढविण्याचे निश्चित झाले आहे.

परंतु, मध्यंतरी शिवसेना भाजपचे संबंध ताणले गेले. यातून शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडीचा पदर धरून सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर सत्ता उलथविण्याला भाजपला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून मोठा गट बाहेर पडला व राज्यात सत्ता स्थापन केली.

त्याचबरोबर लोकसभेमध्येही शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी नवीन गट स्थापन करत तसे पत्र राष्ट्रपती व निवडणूक आयोगाला दिले. शिवसेनेचा हा गट ‘शिंदे गट’ म्हणून ओळखला जातो. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही शिवसेनेच्या शिंदे गटाला सहानुभूती आहे.

या सहानुभूतीच्या जोरावर शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, त्या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार उभे राहणार असल्याचे चित्र आतापर्यंत तरी आहे.

मात्र असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेचा शिंदे गट व भाजपमध्ये तिकीटवाटपाचा फॉर्म्युला जो काय ठरायचा तो ठरेल, परंतु आपणही इच्छुक असल्याचा अनेकांचा दावा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्ट.

त्यापैकी महापालिकेचे माजी सभागृहनेते व ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन ते अडीच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करताना ते मतदारांपर्यंत पोचले आहेत.

इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर या भागात नागरिक, संस्था तसेच विविध निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाटील यांनी पक्षासाठी काम केले आहे. भाजपचे केंद्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांनी विविध विकासकामांचे उद्‌घाटन करून पक्षपातळीवरही आपण लोकसभेचा उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटील यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात काम उभे करत असताना शिंदे गटाच्या खासदार गोडसे यांच्याकडून अडथळा निर्माण होण्याची भावना निर्माण झाल्याने त्यातूनच गोडसे यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्टरवॉर सुरू करण्यात आले आहे.

त्यात लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून खासदार गोडसे गद्दार व खोकेबहाद्दर असल्याचा थेट आरोप करण्यात आल्याने वादाची नवी ठिणगी पडली आहे. आता खासदार गोडसे या पोस्टरवॉरला कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मौन

मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार गोडसे यांना गद्दार व खोकबहाद्दर संबोधल्यानंतर शिंदे गटाकडून

कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. गोडसे यांच्या एककल्ली कारभारामुळे शिंदे गटाचे पदाधिकारीही त्यांच्यापासून दोन हात दूर असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोडसे यांच्यावर केलेला पोस्टरवॉर शिंदे गटातील अंतर्गत कुरबुरी समोर आणणाराही ठरत आहे.

"खासदार गोडसे यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टचा व माझा काहीही संबंध नाही. यापुढे कुठलीही पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी त्या तपासून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत." - दिनकर पाटील, लोकसभेचे भाजपकडून इच्छुक उमेदवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT