esakal 
नाशिक

एकट्या महिलेला पाहून 'अशी' करतूत करणाऱ्या भामट्याला अखेर घडविली अद्दल!

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (इंदिरानगर) सर्वत्र कोरोनाची भीती असतांना राजीवनगर परीसरात महिन्‍याभरापासून महिलांमध्ये एका भामट्याची दहशद निर्माण झालेली होती. दुचाकीवर येऊन एकट्या महिलांना मागून मारून पसार व्हायचा स्थानिक तरुणांनी या भामट्याला चांगलीच अद्दल घडवायची ठरवलं अन् आखला असा प्लॉन...अन् नंतर घडले असे...

असा आहे प्रकार

परीसरातील नागरीक असलेल्‍या आकाश कदम याने सांगितले, की एक महिन्यापासून हा युवक पॅशनवर तोंडाला मास्क लावून येत असे. महिलांना पाठीमागून मारून तो लगेच पसार व्‍हायचा. त्यामुळे महिला दहशतीखाली आल्‍या होत्‍या व एकट्या घराबाहेर पडणे टाळत होत्या. त्‍यांच्‍यामुळे कुटुंबातील अन्‍य सदस्‍यदेखील संतप्त होते. या प्रकरणाची परीसरात चर्चा झाल्‍यानंतर याचा छडा लावण्यासाठी येथील तरुणांनी मोहीम हाती घेतली होती. स्प्लेंडर हॉलमागे असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा युवक दिसला. मात्र दुचाकीचा क्रमांक स्पष्ट नव्हता. इतर खुणांवरून आकाशसह प्रसाद सोनार, अमित खैरनार, सूरज जांगीड, विराज दाभाडे, साहिल पाटील, प्रतीक निकुंभ, तेजस भटमुळे, तन्मय भटमुळे, प्रसाद कुलकर्णी, अक्षय शर्मा, संजय शर्मा परीसरातील तरूणांनी पाळत ठेवणे सुरू केले. 

एकदाचा सापडला भामटा

बुधवारी (ता. 23) सकाळी साडेआठच्या सुमारास राजीवनगर भागातील दत्तमंदिर परिसरात संबंधित युवकाला यंग ब्रिगेडने पकडले. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. एक वर्षापूर्वी इंदिरानगर भागातील कमोदनगर भागातही अशा घटना घडल्या होत्या. त्या वेळीही नागरिकांनी पोलिस ठाण्यात निवेदने दिली होती. परीसरातील तरूणांनी या भामट्याला पकडण्यासाठी घेतलेल्‍या परीश्रमाचे व दाखविलेल्‍या धाडसाबद्दल पोलिसांनी, महिलांनी आणि लोकप्रतिनिधींनी कौतुक केले.

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

SCROLL FOR NEXT