Latest Marathi News esakal
नाशिक

Aditya Thackeray यांनी बांधलेला पुल गेला पुराच्या पाण्यात; पाहा Video

नाशिक जिल्ह्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक जिल्ह्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे ५० टक्क्यांच्या वर भरत आली असून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. याच दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांमुळे आदिवासी पाड्यावरील एकेकाळी समस्या असलेल्या, मात्र 'सकाळ'च्या एका वृत्तामुळे खुद्द तत्कालीन मंत्री महोदयांनी सोडविलेल्या समस्येत आता पुन्हा एकदा भर पडली आहे. (Latest Marathi News)

खरशेत (तालुका त्र्यंबकेश्वर) येथील तास नदीवरील बल्ल्यांवरून जीव धोक्यात घालून शेंद्री पाड्यावरील महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागायचे. आदिवासी (Tribal) महिलांना 30 फूट खोल तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असे. या प्रश्नाला 'सकाळ' ने वाचा फोडली होती. हे वृत्त प्रसिद्ध होताच तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मदतीची सूचना केली होती. ठाकरे यांच्या सुचनेमुळे अवघ्या दोन दिवसात नदीवर लोखंडी पूल उभारला गेला.

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या कसरतीला वाचा फोडणारे 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त.

आता मात्र संततधार पावसामुळे तास नदीला पूर आलाय. आणि हा पुल पुराच्या पाण्याखाली पूल गेलाय. पुराचा वेग इतका प्रचंड आहे की, पूल उखडून कधी जाईल हे सांगता येत नसल्याचे स्थानिक आदिवासी बांधव सांगत आहेत.

आधी पुल नाही म्हणून जीव धोक्यात घालत नदी ओलांडणाऱ्या या आदिवासी महिलांसमोर एकतर पुलावर पाणी आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जर पाण्याच्या वेगाने जर पुल उखडूनच गेला तर पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न अशी परिस्थीती उद्भवू नये यासाठी येथील आदिवासी बांधव प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT