debris
debris esakal
नाशिक

Nashik News : शहराच्या अंतर्गत रस्त्यांना डेब्रिज ढिगाऱ्यांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वच्छ भारत अभियानात (Swachh Bharat Abhiyan) नाशिकचा क्रमांक सातत्याने घसरत असताना त्यावर उपाययोजना होण्याऐवजी सातत्याने अभियानात क्रमांक घसरण्याचीच तजवीज केली जात आहे का? असा सवाल शहरातील आडमार्गांवर फेरफटका मारल्यास उपस्थित होतो. (Bypasses are surrounded by piles of construction debris nashik news)

सध्या आडमार्गांना बांधकामाच्या डेब्रिज ढिगाऱ्यांनी घेरले आहे. जागोजागी डेब्रिजच्या ढिगाऱ्यांमुळे स्वच्छतेत पहिल्या दहामध्ये येण्याचे फक्त गाजर दाखविले जात असल्याचीच चर्चा आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानाचा महापालिकेने गवगवा केला आहे. दर वर्षी पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात मात्र क्रमांक वर्षागणिक घसरत आहे. दर वर्षी ऑगस्टमध्ये शहरांचे मानांकन जाहीर केले जाते. त्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले जाते.

परंतु हा जोष जेमतेम आठ ते दहा दिवस टिकतो. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. मागील वर्षी नाशिकचे मानांकन घसरण्यास बांधकामे कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने त्यातून हवेत धुलिकण वाढल्याचा दावा केला गेला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना बांधकामांच्या साइटसवर ग्रीन नेट लावणे बंधनकारक करण्यात आले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी ४० जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत सहा विभागांसाठी यांत्रिकी झाडू, सहा रोबोटिक यंत्रे खरेदी केले जाणार आहेत. स्वच्छतेसाठी एकीकडे खर्चाचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष

शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींच्या पुनर्विकासाची कामे होत आहेत. जुनी इमारत किंवा वाडे पाडल्यानंतर त्याचा मलबा टाकण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने मोकळ्या ठिकाणी बांधकामाचा मलबा (डेब्रिज) टाकला जातो.

गंगाघाट, पंचवटी अमरधाम, वडाळा रोड, देवळाली गावाकडून चेहेडीकडे जाताना, जेल रोड भागातील पवार मळा भागातून एकलहरेकडे जाताना, टाकळी गाव ते ड्रीम सिटी, टाकळी रोड या ठिकाणी डेब्रिजचे ढीग निदर्शनास येतात. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छ भारत अभियानाची तयारी होत असताना बांधकाम मलब्यांच्या ढिगाऱ्याकडे होत असलेले दुर्लक्ष संशयाला कारणीभूत ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT