Rupali Randhwe along with Vikram Randhwe, Ganesh Raut and others while giving a statement to the Collector of Nashik regarding the chaotic affairs of Nagar Panchayat. esakal
नाशिक

Nashik News: निफाड नगरपंचायतीत अनागोंदी कारभार; माजी नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

निफाड (जि. नाशिक) : नगरपंचायत मधील पाणीपुरवठा आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरु असून या विभागाच्या प्रमुखांकडून स्वच्छता विभागाच्या वार्षिक घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला असल्याची तक्रार माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका रूपाली रंधवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना निवेदन देखील दिले. (Chaotic administration in Niphad Nagar Panchayat Complaint of former mayor to district collector Nashik News)

जिल्हाधिकारी यांना नगरसेविका रूपाली रंधवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की पाणी व आरोग्य विभागप्रमुख यांनी शहरात दैनंदिन कचरा व स्वच्छता केली जात नसताना देखील स्थानिक नागरिकांच्या खोट्या सह्या घेत ठेकेदाराला दर महिन्याला सुमारे ११ ते १२ लाख रुपये देयके अदा करण्यात आले आहे.

तसेच स्वच्छता बाबतच्या जनजागृतीच्या कामात देखील नागरिकांच्या खोट्या सह्या घेऊन खोटे बिल काढले गेले त्यामध्ये देखील दोन चेक काढून नगरपालिकेची दिशाभूल झालेली होती. याबाबात मा. लोकायुक्त मुंबई येथे तक्रार केल्यावर संबंधित महिला अधिकाऱ्याने चुकीचे व खोटे कारण व कागदपत्र तयार करून दिशाभूल केलेली आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

याशिवाय घंटा गाड्या गॅरेजला असताना बिले काढणे, नगरपंचायत मालकीचे ट्रॅक्टर वापरून इतर वाहनांचे बिले तयार करत ते काढणे, कर्मचारी गैरहजर असताना त्यांची बिले काढणे, पाणी पुरवठ्याच्या मोटारी पंप जळाल्याचे दाखवून खोटे कागदपत्र तयार करून चुकीच्या पद्धतीने बिल काढून घेणे असे प्रकार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे या प्रकरणातील संबंधित यांची चौकशी करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेविका श्रीमती. रंधवे यांनी केली आहे. जर संबंधित यांच्यावर कारवाई न झाल्याने २६ जानेवारी २०२३ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे व नगरसेवक जावेद शेख यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT