bhujbal on raut esakal
नाशिक

Chhagan Bhujbal on Sanjay Raut : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष ठेवले असते तर..! भुजबळंचा राऊतांना खोचक टोला

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal on Sanjay Raut : ‘आघाडीत बिघाडी नको’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उगाचच काही ना काही उकरून काढतं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे व जयंत पाटील हे नेते नेतृत्व करणारे आहेत ते कुठे गेले, कोणाच्या घरी गेले, त्यांना माहीत.

परंतु संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटाच्या आमदारांच्या बॅगांवर ठेवले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे खासदार राऊत यांना लगावला. (Chhagan Bhujbal attacking statement on Sanjay Raut maharashtra politics nashik news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात दोनदा जाण्याच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. त्यावर खासदार राऊत यांनी सामनाच्या लेखा मधून टीका केली.

खासदार शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते आहेत. परंतु पक्ष पुढे नेता येईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. अशी टीका करण्यात आली आहे.

त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे सांगितले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आहेत व त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या नेत्यांवरची जबाबदारी टाकली जाईल. ती समर्थपणे पेरण्याची धमक आहे. खासदार राऊत यांचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते नेतृत्व करणारे आहेत. ते कोणाच्या घरी गेले हे त्यांना माहीत. परंतु राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटाच्या आमदार व त्यांच्या बॅगांवर ठेवले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती.

धर्मांमध्ये तेढ नको

कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने धार्मिक व विषारी प्रचार जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटात चुकीचे दाखवण्यात आले आहे. याबद्दल मला माहीत नाही परंतु धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. असेही श्री. भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT