chhagan bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षण ही गोष्ट एकटा मी अडवू शकतो का? भुजबळांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal News : शासन व राजकारणात अनेक जण आहेत, त्यामुळे आरक्षण ही गोष्ट एकटा छगन भुजबळ अडवू शकतो का, असा सवाल करून आरक्षणाचा प्रश्न नेत्यांना, मंत्र्यांना आणि सर्वपक्षीयांना विचारा... मला एकट्यालाच का विचारता, असा प्रश्‍न अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. १३) येथे उपस्थित केला.

मी ओबीसीचे काम ३५ वर्षांपासून करीत आलो असून, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, ही भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (chhagan bhujbal statement about maratha reservation nashik news)

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुजबळांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की मी एका जातीचे नव्हे, तर पावणेचारशे जाती असलेल्या एका वर्गाचे राजकारण करीत आहे.

ज्यात वेगवेगळ्या समाजाचे मी प्रतिनिधित्व करतो. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करीत नसून, मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही. किंबहुना, कोणीही ओबीसी समाजाला विरोध करू नये अन कोणी कोणाला विरोध न करता सगळ्यांची व्यवस्था केली तर चांगले होईल, असेही ते म्हणाले.

मी विकासासाठी येवला-लासलगाव मतदारसंघात आलो असून, याच मुद्द्यावर मी निवडून येत आहे. उलट अनेकांचा राजकीय पक्ष एरवी वेगळा असतो; परंतु निवडणुकीत मात्र विकासाच्या मुद्द्यावर ते मला ‘सपोर्ट’ करतात. मी लोकांचे प्रश्नही सोडवत असून, त्यामुळे कितीही राजकीय प्रश्न उपस्थित केले तरी मला काळजीचे कारण नाही.

आरक्षण मिळू शकते का, हे मलाच का विचारता, असा सवाल करून हा सवाल पवारसाहेब, मुख्यमंत्री यांना विचारा, काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, महाविकास आघाडीलाही विचारा... मी तर एकटाच आहे. मंत्रिमंडळ खूप मोठे असून, वेगवेगळ्या पक्षांचे अनेक नेते आहेत, त्यांनाही विचारा, असेही भुजबळ म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे सरकार येणार नाही, असे वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, की ते राजकीय अनुभवामुळे बोलत असतील; पण आज तरी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही.

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदावरून आपापसात भांडणे आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकर हे तरी कुठे इंडिया आघाडीत आहेत? वेगवेगळे निवडणूक लढतील, यावरून पुढचे चित्र काय आहे, हे आज दिसत असल्याचे सांगत भुजबळ यांनी त्यांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT