chhagan bhujbal 
नाशिक

केंद्र सरकारकडून ‘ईडी’चा गैरवापर; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

विक्रांत मते

नाशिक : भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून त्रास देण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे.  

‘ईडी’ची टांगती तलवार कायम राहणार

भुजबळ म्हणाले की जो विरोधात बोलेल, त्याला ‘ईडी’च्या माध्यमातून त्रास देण्याचे षडयंत्र केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू आहे. हे आता नवीन राहिलेले नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले, त्याचवेळी ‘ईडी’च्या नोटिशीचा सासेमिरा मागे लागेल हे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय आर्थिक महासंचालनालय अर्थात, ‘ईडी’ची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यूपीएच्या झेंड्याखाली सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपला रोखणे सहज शक्य आहे. त्यासाठी एकत्र यावे लागेल. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’तून लिहिलेला अग्रलेख उद्वेगातून आला. पीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप भुजबळ यांनी फेटाळताना विमा कंपन्या आर्थिक फायदा बघत असल्याचे स्पष्ट केले. टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात, त्या वेळी टोल कंपन्यांनी सहानुभूतीने वागण्याचा सल्ला देताना वाहनांच्या लांब रांगा लागू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

Winter Body Detox: औषधांची गरज नाही; हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्याचे ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT