नाशिक : तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी (ता. ३०) सायंकाळी लाखो उत्तर भारतीय महिलांनी सूर्यदेवाला अर्ध्य देत पारिवारीक सुख, समृद्धीबरोबरच पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. सायंकाळी मावळत्या सूर्यदेवाला अर्ध्य देण्यासाठी लाखोंच्या संख्येने गंगाघाटावर आलेल्या उत्तर भारतीयांमुळे गंगाघाटावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सोमवारी (ता. ३१) सकाळी सूर्यदेवाला अर्ध्य देत छटव्रताची समाप्ती होईल. (Chhat Puja North Indian gathered at Ganga Ghat for Chhath Puja Nashik News)
रविवारी दुपारपासूनच गंगाघाटावर येण्यासाठी उत्तर भारतीयांची लगबग सुरू होती. सायंकाळी सहानंतर लाखो भाविक सहकुटुंब गंगाघाटावर जमा झाल्याने अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत सूर्यदेवाला अर्ध्य देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. पंचवटी पोलिसांनी मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, सरदार चौक, खांदवे सभागृह आदी भागात बॅरिकेटिंग करून गंगाघाटावर येणाऱ्या वाहनांना बंदी घातली होती.
छटपूजेसाठी गंगाघाटावर खेळणीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणावर लावले होते. कोरोनानंतर प्रथमच पंचवटीच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बुस्ट मिळाला.
छटपूजेसाठी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे भोजपुरी गाण्यांचा कार्यक्रम झाला. आायमाचे अध्यक्ष निखिल पंचाल यांच्यासह छट समितीचे अध्यक्ष गोविंद झा, पद्माकर पाटील, संतोष उपाध्याय, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, गारगोटी संग्राहलयाचे के. सी. पांडे यांच्यासह लोकप्रतिनिधींचा संस्थेचे अध्यक्ष उमापती ओझा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अश्विन महिन्याच्या अमावस्येला दीपावलीनंतर अत्यंत कठीण असे चारदिवसीय व्रत कार्तिक शुद्ध षष्टीला उत्तर भारतीय महिला करतात. छटपूजा सूर्यदेवाची पूजा, उपासना असून, आपल्या शास्त्रानुसार प्रत्यक्ष दिसणारी देवता म्हणून या पूजनाला विषेश महत्त्व आहे. सूर्य आणि षष्टीमातेस भाऊ-बहीण मानले गेले आहे. षष्टीमाता कार्तिकेयची पत्नीही आहे. विज्ञानाच्या दृष्टीनेही या पूजेस वेगळे महत्त्व आहे.
छटपूजेचे धार्मिक महत्त्व
वर्षातून दोनदा होणारी छटपूजा कुटुंबासह संततीची रक्षा करते, अशी धारणा आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापासून षष्ठीव्रतास आरंभ होते. पहिल्या दिवशी सेंधवा मीठ, तुपाने बनविलेले तांदूळ आणि कदूची भाजी प्रसादरूपाने वाढली जाते. दुसऱ्या दिवसापासून उपवास सुरू होतो. यादिवशी रात्री खीर बनविली जाते. तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्यदेवास अर्ध्य दिले जाते. अंतिम म्हणजे चौथ्या दिवशी उगवत्या सूर्देवास अर्ध्य देऊन या व्रताची समाप्ती होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.