ssc exam result 2023 esakal
नाशिक

Nashik SSC Result Update : शहरासह ग्रामीणमध्ये सावित्रीच्या लेकीच हुशार..!

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, सावित्रीच्‍या लेकींनी यंदाही घवघवीत यश मिळविले आहे. प्रगत समजल्‍या जाणाऱ्या नाशिक शहरासह प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या स्‍तरावर विद्यार्थिनीच अव्वल आहेत.

पंधरा तालुके आणि नाशिक, मालेगाव महापालिका असे एकूण सतरा क्षेत्रांपैकी तब्‍बल पंधरा क्षेत्रांमध्ये मुलींच्‍या उत्तीर्णांची टक्‍केवारी नव्वदहून अधिक आहे. (city as well as village ssc topper girls passing rate of girls in fifteen out of seventeen fields district ninety percent Nashik News)

मुलींच्‍या उत्तीर्णाचे उच्चांकी ९५.९३ टक्‍के प्रमाण निफाड तालुक्‍यातील असून, निच्चांकी ८०.११ टक्‍के प्रमाण कळवण तालुक्‍यातील आहे.

दहावीचा निकाल जाहीर होताच, सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. राज्य असो किंवा विभाग, जिल्ह्यापासून तालुक्याच्या पातळीपर्यंत सर्वच स्तरांवर उत्तीर्णांमध्ये मुलींचेच प्रमाण सर्वाधिक आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आणि नाशिक महापालिका क्षेत्र, मालेगाव महापालिका क्षेत्र अशा आकडेवारीचे विश्लेषण केले तर चार क्षेत्रांचा निकाल नव्वद टक्क्यांहून कमी आहे. उर्वरित तेरा क्षेत्रांचा निकाल नव्वद टक्क्यांहून अधिक राहाण्यामागे मुलींचे उज्‍ज्‍वल यश कारणीभूत आहे.

येवला तालुका आघाडीवर

जिल्ह्यातील आकडेवारीची तुलना केल्यास येवला तालुक्‍याचा सर्वाधिक ९४. ३७ टक्‍के निकाल लागला आहे.

निकालाच्‍या टक्‍केवारीच्‍या बाबतीत नाशिक महापालिका क्षेत्राचा पाचवा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी कळवण तालुक्‍याचा निकाल ७३.४४ टक्‍के लागला असला तरी या तालुक्‍यात मुलींच्‍या उत्तीर्णतेचे प्रमाण ८०. ११ टक्‍के इतके आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुकानिहाय उत्तीर्णांची टक्‍केवारी अशी-

तालुका मुले मुली एकूण

येवला ९२.१९ ९६.८७ ९४.३७

सटाणा ९२.६५ ९६.०८ ९४.२२

नांदगाव ९२.२६ ९५.०१ ९३.४७

देवळा ९२.४२ ९४.७० ९३.४०

नाशिक मनपा ९१.५८ ९५.४१ ९३.३७

चांदवड ८५.९४ ९२.१२ ८८.७८

दिंडोरी ८७.५१ ९२.८१ ९०.०६

इगतपुरी ८९.६९ ९३.८९ ९१.६१

कळवण ६७.२० ८०.११ ७३.४४

मालेगाव ८९.०३ ९२.१८ ९०.४५

नाशिक ८८.०० ९३.५५ ९०.५९

निफाड ८९.९९ ९५.९३ ९२.७०

पेठ ९१.४८ ९४.३६ ९२.९९

सुरगाणा ८२.०७ ८९.७६ ८६.०४

सिन्नर ९१.०५ ९५.४४ ९३.०२

त्र्यंबकेश्‍वर ८९.४५ ९४.९१ ९२.१४

मालेगाव मनपा ८१.५७ ९१.२९ ८६.६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT