civil-hospital.jpg 
नाशिक

Covid19 : चिंताजनक! 'महापालिकेच्या रुग्णालयात एकही फिजिशियन नाही?'...अन् अवघे 177 व्हेंटिलेटर, तीन हजार मास्क!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : आतापर्यंत कोरोनापासून लांब राहिलेल्या नाशिकच्या ग्रामीण भागातून कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. महापालिकेने तातडीने शासकीय व खासगी रुग्णालयांचा एक अहवाल तयार केला असून, त्यात शहरात अवघे 167 व्हेंटिलेटर असल्याची बाब समोर आली आहे. सुमारे वीस लाख लोकसंख्येचा विचार करता व्हेंटिलेटरची संख्या अपुरी असल्याने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेसह जिल्हा यंत्रणेने तयारी केली आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयात एकही फिजिशियन नाही

शहरात रविवारी (ता. 29) एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. त्यानुसार शहरातील रुग्णालयांचा आढावा घेतल्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात साधने अपुरे असल्याची बाब समोर आली आहे. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयात एकही फिजिशियन नाही. एका शासकीय रुग्णालयात एक फिजिशियन, तर व्हेंटिलेटरची संख्या अवघी नऊ आढळली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात एक, तर खासगी रुग्णालयांत 167 व्हेंटिलेटर आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात 400 खाटा असल्या तरी एकही फिजिशियन नसणे, ही बाब गंभीर म्हणावी लागेल. 

एक लाख मास्क खरेदी करण्याचे नियोजन

शहरात ट्रीपल लेअर मास्क अवघे तीन हजार असून, एक लाख मास्क खरेदी करण्याचे नियोजन आहे. एन-95 मास्क अवघे 557 असून, पाच हजार खरेदीचे नियोजन आहे. सोडिअम हायपोक्‍लोराइड पाच हजार लिटर, तर सातशे हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध आहेत. वातावरण निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायड्रोक्‍लोरिक्‍व्यून 200 मिलिग्रॅम व हायड्रोक्‍लोरिक्‍व्यून 400 मिलिग्रॅम उपलब्ध असून, अनुक्रमे 20 व 70 हजार खरेदी केले जाणार आहे. डिस्पॉसिबल हॅन्ड ग्लोव्हज पाच हजार असून, अजून एक लाख खरेदीचे नियाजन आहे. 

रुग्णालयांमधील सद्यःस्थिती 

माहिती शासकीय रुग्णालये, महापालिकेचे रुग्णालये, खासगी रुग्णालये , एकूण

एकूण रुग्णालये ----- 2-- 4 -- 571 ---577 

एकूण खाटा ----- 697-- 400 -- 8,519 --- 9,616 

आसीयूतील खाटा ----- 32--  10--  572 ---  614 

व्हेंटिलेटर ----- 9 -- 1 --167 --- 177 

फिजिशियन ----- 1-- 0 -- 78 --- 79

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT